Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Vakri: पुढच्या वर्षी जुलैमध्ये शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या व्यक्तींची तिजोरी पैशांनी भरणार

Shani Vakri 2025: पुढच्या वर्षात जुलैमध्ये शनिदेव उलट फिरणार आहे. शनिदेव मीन राशीमध्ये सुमारे 138 दिवस उलट फिरणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. २०२४ वर्ष संपून २०२५ या वर्षाला सुरुवात होणार आहे. हे वर्ष ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाचं मानलं जातंय. याचं कारण म्हणजे या वर्षी अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह शनी देव देखील त्यांच्या स्थितीमध्ये बदल करणार आहेत

पुढच्या वर्षात जुलैमध्ये शनिदेव उलट फिरणार आहे. शनिदेव मीन राशीमध्ये सुमारे 138 दिवस उलट फिरणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या काळात काही राशींना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कुंभ रास

शनिदेवाची वक्री चाल तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतून धन आणि वाणीच्या स्थानात वक्री होणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. तुमचे वरिष्ठांशी असलेले संबंध अधिक घट्ट होऊ शकणार आहेत. नोकरदार लोकांना फायदा होणार आहे. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची वक्री चाल अनुकूल ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतून तुमच्या कर्म घरात वक्री होणार आहेत. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकणार आहे.

मकर रास

शनिदेवाची वक्री गती तुमच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात वक्री होणार आहेत. तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या भावा-बहिणींचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे. तसंच नोकरदार लोकांना नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या व्यावसायिक भागीदारांच्या पाठिंब्याने अधिक फायदे मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

SCROLL FOR NEXT