New Year Astro Remedies: 1 जानेवारीपासून करा 'या' गोष्टी; नव्या वर्षात सदैव राहील लक्ष्मीची कृपा, पैसाही हाती येणार

New Year 2025 Astro Remedies: 2025 हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं आणि भरभराटीचं असावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची सुरुवात योग्य पद्धतीने करणं फार गरजेचं आहे.
New Year 2025 Astro Remedies
New Year 2025 Astro Remediessaam tv
Published On

उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आज २०२४ या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात विशेष मानण्यात येते. नवीन वर्ष नेहमीच नवीन आशा आणि भरपूर आनंद घेऊन येतं. 2025 हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं आणि भरभराटीचं असावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याची सुरुवात योग्य पद्धतीने करणं फार गरजेचं आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्षाची सुरुवात काही ज्योतिष्य उपायांनी केल्यास ते तुमच्या जीवनात सुख, समृद्धी घेऊन येईल. तुमच्यावर संपत्तीची देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर राहू शकणार आहे. चला तर मग जाणून घेऊया 2025 च्या सुरुवातीला कोणते उपाय केले पाहिजेत.

ब्रह्म मुहूर्तावर उठा

सनातन धर्मात ब्रह्म मुहूर्ताचा काळ अत्यंत शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तामध्ये केलेल्या कामाचं फळ अनेक पटीने मिळू शकतं. त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर जागरण करून नवीन वर्षाची सुरुवात केली पाहिजे. यावेळी ध्यान, योग किंवा प्रार्थना करा.

New Year 2025 Astro Remedies
Grah Gochar: गुरु, शनि आणि राहू-केतू मिळून 'या' राशींचं नशीब चमकवणार; बक्कळ पैसा मिळून उत्पन्नात होणार वाढ

सकाळी उठून काय करावं?

ज्योतिषशास्त्रानुसार, सकाळी उठल्याबरोबर तळहातांकडे पाहणं शुभ मानण्यात येतं. असं म्हणतात की, लक्ष्मी, सरस्वती आणि भगवान विष्णू आपल्या तळ हातात वास करतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उठल्याबरोबर तुमच्या तळहातांकडे पाहा आणि या मंत्राचा जप करा.

“कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती।

करमूले स्थितो ब्रह्मा, प्रभाते करदर्शनम्।।”

New Year 2025 Astro Remedies
Dhan yog : १ जानेवारीपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; मंगळ-चंद्र बनवणार धन योग, पडणार पैशांचा पाऊस

गरजूंना दान करा

एखाद्या गरजूला मदत करून नवीन वर्षाची सुरुवात करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा इतर आवश्यक वस्तू दान करा. यामुळे तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळू शकते. नव्या वर्षाची सुरुवात करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

New Year 2025 Astro Remedies
Dhan yog : १ जानेवारीपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; मंगळ-चंद्र बनवणार धन योग, पडणार पैशांचा पाऊस

देवाजी पुजा करा

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाची पूजा करा. घरातील देव्हाऱ्या दिवा लावा आणि संपूर्ण कुटुंबासह देवाकडे प्रार्थना करा. या दिवशी घर सजवा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. घरातील आनंदी वातावरण ठेवा. जेणेकरून वर्षाची सुरुवात आनंददायी होईल.

New Year 2025 Astro Remedies
January Grah Gochar: जानेवारीत सूर्य-मंगळासोबत ४ मोठे ग्रह करणार गोचर; 'या' राशींवर होणार धनाची बरसात

नवा संकल्प करा

नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवातीचा काळ मानला जातो. या दिवशी तुमचं जीवन सुधारण्यासाठी एक चांगला संकल्प घ्या. यामध्ये तुम्ही दररोज व्यायाम करणं, वेळेवर काम करणं किंवा कोणतीही वाईट सवय सोडून देणं हे संकल्प करू शकता.

New Year 2025 Astro Remedies
January Grah Gochar: जानेवारीत सूर्य-मंगळासोबत ४ मोठे ग्रह करणार गोचर; 'या' राशींवर होणार धनाची बरसात

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com