Shani Vipareet Rajyog  saam tv
राशिभविष्य

Vipreet Rajyog 2025: 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत मार्गी होणार शनी; विपरीत राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

Shani Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाचा हा राशी बदल केवळ काही राशींसाठी साडेसाती किंवा धैय्या घेऊन येत नाही, तर काही भाग्यवान राशींसाठी तो विपरीत राजयोग तयार करतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांपैकी शनी ग्रहाला न्यायाचा देवता मानण्यात येतं. हिंदू धर्मग्रंथांनुसार, शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फल देतात. शनीदेवांच्या राशी बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम दिसून येतो. मागील 138 दिवसांपासून शनी मीन राशीत वक्री अवस्थेत होते, मात्र आता 28 नोव्हेंबर 2025 रोजी ते मार्गी होणार आहेत.

ज्योतिष्य गणनेनुसार, शनीच्या या मार्गी स्थितीमुळे 'विपरीत राजयोग' तयार होणार आहे. यामुळे काही राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात चांगल्या संधी येणार आहेत.

विपरीत राजयोग म्हणजे काय?

जेव्हा शनी ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी होतो, तेव्हा विपरीत राजयोग तयार होतो. हा योग अशा व्यक्तींना लाभदायक ठरतो. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळू शकणार आहे ते पाहूयात.

धनु रास

धनु राशीच्या चौथ्या भावात शनी मार्गी होणार आहेत. या योगामुळे धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. यावेळी तुमच्या सुख-शांतीत भर पडण्याची शक्यता आहे. घर, वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या आठव्या भावात शनी मार्गी होणार आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात वेतनवाढीचे योग तयार होणार आहेत. जे लोक करिअरमध्ये स्थैर्याच्या शोधात होते त्यांना आता पुढे जाण्याची संधी मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होणार आहे.

मीन रास

मीन राशीच्या लग्न भावात शनी मार्गी होणार आहेत. हा काळ मीन राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, यश आणि भाग्याचा साथ देणारा ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak-Godbole: असं सौंदर्य पाहून काळजाची धाकधूक वाढली,अभिनेत्री गिरिजाचे फोटो पाहाच

Adinath Kothare: अदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री, 'डिटेक्टिव धनंजय' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Maharashtra Live News Update : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील मनाने राष्ट्रवादीत; राम सातपुते यांचा खोचक टोला

Diljit Dosanjh: अमिताभ बच्चन यांच्या पाया पडणं पडलं महागात; खलिस्तानीकडून प्रसिद्ध गायकाला आणखी एक धमकी

Julie Yadav: मोबाईल घरी विसरली म्हणून पुन्हा घरी गेली आणि...! भारतीय महिला हॉकी खेळाडूचा अपघतात मृत्यू

SCROLL FOR NEXT