Saturn Transit Purva Bhadrapada Nakshatra saam tv
राशिभविष्य

Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश, पैसा

Saturn Transit Purva Bhadrapada Nakshatra: शनि हा न्याय देणारा आणि कर्मफल देणारा मानला जातो. शनि हा न्याय देणारा आणि कर्मफल देणारा मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या राशीप्रमाणे नक्षत्रात देखील गोचर करतात. नवग्रहांमध्ये शनी देवाला खूप महत्त्व देण्यात येतं. शनि हा न्याय देणारा आणि कर्मफल देणारा मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. यावेळी शनीदेव वेळोवेळी नक्षत्र देखील बदलतात.

ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या राहूच्या नक्षत्रात शतभिषा नक्षत्रात असून वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यात शनी नक्षत्र बदलून पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीने गुरूच्या नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे काही राशींचे भाग्य चमकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

पूर्वा भाद्रपद नक्षत्रात शनीचं गोचर या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना मोठ्या आर्थिक लाभासोबतच नोकरी आणि व्यवसायात मोठं यश मिळणार आहे. या काळात पगारवाढीसह काही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

सिंह रास

या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर पैसाही मिळू शकणार आहे. भागीदारीत केलेल्या कामाचा मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली असू शकते. नोकरदारांनाही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. वैवाहिक जीवनातच आनंद येऊ शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OTT Releases: 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ते 'द ट्रायल २'; या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार हे धमाकेदार चित्रपट आणि सीरिज

Dhananjay Munde: राजकीय कमबॅक की समाजाला न्याय? बंजारा आरक्षणावर धनंजय मुंडेंचं राजकारण?

Online Train Ticket booking : रेल्वेचा मोठा निर्णय; तत्काळचा नियम आता आरक्षित जनरल तिकीटालाही, १ ऑक्टोबरपासून होणार लागू

Bone Glue: हात-पाय मोडले तरी लगेच जुळतील? 2 मिनिटांत हाडं जोडणारा बोन ग्लू?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT