Saturn Direct November 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Margi: नोव्हेंबर महिन्यात शनी होणार मार्ग्रस्थ; 'या' ३ राशींची कर्ज, आजारपणातून होणार मुक्तता

Saturn Direct November 2025: सध्या शनिदेव मीन (Pisces) राशीत वक्री (Retrogade) अवस्थेत भ्रमण करत आहेत, पण लवकरच ते आपली चाल बदलणार आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये शनिदेव मार्गी (Direct) होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवांना विशेष स्थान देण्यात आलंय. येत्या काळात शनी देव त्यांच्या चालीत बदल करणार आहेत. यामध्ये २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शनि मीन राशीत मार्ग्रस्थ होणार आहेत. ज्योतिषानुसार, शनि मार्गी झाल्यानंतर काही राशींसाठी शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

शनीदेवाच्या या स्थिती बदलाने काही राशींचं भाग्य उजळणार आहे तर काहींना करिअर आणि नोकरीत प्रगतीची संधी निर्माण होणार आहे. यावेळी काही व्यक्तींची आर्थिक स्थिती देखील मजबूत होणार आहे. शनि मार्गी झाल्याने मानसिक स्थैर्य, शांतता आणि जीवनात समतोल निर्माण होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या काळात शनि तुमच्या दशम भावात (करिअर भावात) मार्ग्रस्थ होणार आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी यश, प्रगती आणि पदोन्नतीचे उत्तम योग निर्माण होणार आहे. यापूर्वी तुम्ही काही जुनी गुंतवणुक केली असेल तर त्यातून आर्थिक प्रकरणांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांची साथ मिळणार आहे.

तूळ रास

शनि तुमच्या सहाव्या भावात मार्गी होतील. यामुळे तुमच्या जीवनातील अडचणींवर विजय मिळवण्यात तुम्हाला यश मिळू शकणार आहे. मागील काही काळापासून तुम्ही जर कर्ज, वैर किंवा अडथळ्यांनी त्रस्त असाल, तर आता त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या बळावर तुम्ही पुढील काळात स्थिरपणे प्रगती कराल.

धनु रास

शनी तुमच्या चतुर्थ भावात मार्गी होणार आहे. त्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद, शांती आणि घरातील सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांशी संबंध अधिक दृढ होणार आहे. घरातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. या काळात घर आणि कुटुंबाकडे लक्ष दिल्यास मानसिक संतुलन आणि स्थैर्य मिळू शकणार आहे.

मीन रास

शनि तुमच्या लग्न भावात मार्गी होणार आहे. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ, आरोग्यात सुधारणा आणि वैयक्तिक प्रगतीचे उत्तम संकेत मिळत आहेत. तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. शनिदेवांच्या मार्गी हालचालीमुळे तुमच्या आयुष्यात स्थैर्य, समतोल आणि सकारात्मकता येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - १४ नोव्हेंबरला बिहारला मिळणार नवा मुख्यमंत्री, वाचा निवडणूकीचं संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Costal Road : वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दणका बसणार; मुंबईतील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मोठा निर्णय

गौतमी पाटील कारवाईच्या कचाट्यातून 'निसटली'! १०० पेक्षा जास्त CCTV चेक केले, शेवटी पोलिसांना नेमका क्लू मिळाला

Metro 3 बाबत महत्त्वाची अपडेट! वरळी ते कफ परेडदरम्यान मेट्रो धावणार, मुंबईकरांचा वेळ वाचणार

Fast Charging Risks: फास्ट चार्जिंग वापरताय? स्मार्टफोनवर होऊ शकतात वाईट परिणाम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT