budh shani yuti saam tv
राशिभविष्य

Budh-sharni Gochar: शनी-बुधाने बनवला अद्भुत संयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

Budh-sharni Gochar: शनीच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. बुध कन्या राशीमध्ये आणि शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत विराजमान आहे. यावेळी दोघांमध्ये 180 अंशांचं अंतर आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, नवग्रहामध्ये प्रत्येक ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. राशी परिवर्तनामध्ये शनी हा सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह असतो. एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी शनी ग्रहाला ३० वर्षांचा कालावधी लागतो. शनीच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने गोचर केलं आहे. अशावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये बुध कन्या राशीमध्ये आणि शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत विराजमान आहे. यावेळी दोघांमध्ये 180 अंशांचं अंतर आहे. शनि आणि बुध समोरा-समोर असल्याने काही राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुधाचे समोरासमोर असणं फायदेशीर ठरू शकणार आहे. अशावेळी या राशीच्या लोकांच्या जीवनावर अनुकूल प्रभाव पडू शकणार आहे. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार काम मिळू शकणार आहे.

कुंभ रास

शनीच्या या स्थितीमुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यातही आनंद येऊ शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकणार आहे. तुमचा पगार प्रमोशनसोबत वाढू शकणार आहे. विद्यार्थ्यांनाही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मेष रास

शनी आणि बुधाच्या या स्थितीचा या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या नोकरीत येणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येऊ शकणार आहेत. वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहणार आहे. कुटुंबामध्ये सर्व चांगल्या गोष्टी घडणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT