Shani Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Shani Margi 2024: सर्व ग्रहांमध्ये संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी देव. यावेळी शनीदेवाने नोव्हेंबर महिन्यात त्यांची स्थिती बदलली आहे.

Surabhi Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. सध्या नोव्हेंबर महिना सुरु असून या महिन्यात अनेक ग्रहांनी त्यांची स्थिती बदलली आहे. सर्व ग्रहांमध्ये संथ गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी देव. यावेळी शनीदेवाने नोव्हेंबर महिन्यात त्यांची स्थिती बदलली आहे.

न्यायाचे देवता शनिदेव महाराज मार्गस्थ झाले आहेत. 15 नोव्हेंबर रोजी शनि मार्गी झाल्यामुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. यावेळी काही राशींना या काळात नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना शनिच्या मार्गी स्थितीत प्रत्येक पावलावर सावध राहावं लागणार आहे. यावेळी कर्क राशीच्या लोकांनी या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक बोलावं लागेल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना त्यांचं नातं जपावं लागणार आहे. तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, अनावश्यक खर्चापासून दूर राहा. या काळात तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त ताण घेऊ नका. गुंतवणूकीतून मनासारखा परतावा मिळणार नाही.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी सध्या शनीची साडे सती चालू असणार आहे. शनि मार्गी असल्यामुळे मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. धनहानी होण्याचा धोका अधिक आहे. कोणतंही काम सावधगिरीने करावं लागणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'एक मैं और एक तू... ', जेव्हा अमित ठाकरे गाणं गातात | Marathi News

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

SCROLL FOR NEXT