shani ast  saam tv
राशिभविष्य

Shani Ast: शनीदेवाची अस्त स्थिती 'या' राशींना त्रस्त करून सोडणार; खडतर काळ होणार सुरु; आर्थिक फटका बसणार

Shani Ast २०२५: शनीचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. याआधी शनी सुमारे ३७ दिवस अस्त अवस्थेत राहणार आहे. या काळात 3 राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. न्यायाधीश आणि परिणाम देणारा ग्रह मानला जातो. न्यायाची देवता शनि 2025 मध्ये कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनीचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे. याआधी शनी सुमारे ३७ दिवस अस्त अवस्थेत राहणार आहे. या काळात 3 राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

किती काळ शनी राहणार अस्त?

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि सर्वात मंद गतीने चालतो. 28 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:01 वाजता शनि कुंभ राशीमध्ये अस्त होणार आहे. तर 6 एप्रिल 2025 पर्यंत या स्थितीत राहणार आहे. याशिवाय 29 मार्च 2025 रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी कोणत्या राशीच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे ते पाहूयात.

मेष रास

शनीची स्थिर स्थिती मेष राशीसाठी हानिकारक असू शकणार आहे. या काळात तुमचा खर्च वाढू शकणार आहे. कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन कामं सुरू करणे टाळा. नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. काही गोष्टी तुम्हाला मानसिक तणावाखाली ठेवू शकतात. आरोग्याच्या बाबतीतही समस्या उद्भवू शकतात. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागू शकतं. अनावश्यक वादांमुळे तुम्ही त्रस्त व्हाल.

वृश्चिक रास

तुम्ही कोणतेही काम संयमाने केलं तर तुम्हाला त्याचं यश नक्कीच मिळू शकणार आहे. कोणत्याही एका कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होणार आहे. वारंवार नवीन प्रयत्न करणं किंवा जास्त अपेक्षा ठेवल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि वादविवादापासून दूर राहा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

Maharashtra News Live Update: अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

Weather Update: चक्रीवादळाचा धोका! आज सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस, १५ राज्यांना झोडपून काढणार; महाराष्ट्रात कसं राहिल हवामान?

Thursday Horoscope : पैशाचे व्यवहार करताना सावध राहा! ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT