HOROSCOPE  Saam Tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : प्रेम आणि पैसा एकत्र मिळणार; या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस असणार खास

Saturday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना प्रेम आणि पैसा एकत्र मिळण्याची शक्यता आहे. काही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,७ जून २०२५,ज्येष्ठ शुक्लपक्ष,भागवत एकादशी,बकरी ईद.

तिथी-द्वादशी (अहोरात्र)

रास-तुला

नक्षत्र-चित्रा

योग-वरीयान

करण-बवकरण

दिनविशेष-वृद्धीतिथी

मेष - व्यवसायासाठी पायपीट करावी लागेल. नव नव्या संधी येतील. त्याच्यासाठी आपली सुविधा नसेल तर वाढणे आज गरजेचे आहे.कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळेल.

वृषभ - तब्येतीच्या तक्रारी सतावतील. जुनी दुखणी डोके वर काढतील. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे आज जाणवेल. धावपळीचा दिवस आहे.

मिथुन- शेअर्समध्ये फायदा होईल.अचानक सुसंधी येतील. गुंतवणूक फायद्याची ठरेल.प्रेमात यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. विष्णू उपासना करावी.

कर्क- मातृसौख्य, वाहनसौख्य याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. घरामध्ये वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. पाहुण्यांच्या सरबराईत मन रमेल.

सिंह - धाडसाने जिद्दीने पेटून उठून कामे कराल. कामाच्या ठिकाणी अडचण असली तरी त्यातून सहज वाटही काढाल. दिवस संमिश्र आहे.

कन्या - आज वाणी आणि वाचा याच्यावर विशेष नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही ना याची काळजी घ्या. आज कुठेही साक्षीदार राहू नका.

तुळ - मनासारख्या गोष्टी करण्याच्या मागे लाग आहात. सुखाचा धुंडोळा घ्याल. कदाचित पैसाही आजच्यासाठी दुय्यम गोष्ट असेल .आनंदासाठी खर्चही कराल.

वृश्चिक- विनाकारण पैसे खर्च होतील. मनस्ताप वाढेल. काही गोष्टींमध्ये आपला दोष नसताना अंगावर काही गोष्टी येतील. सावध रहा.

धनु - वागण्या बोलण्यात सुलभता येईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. पैशाचे महत्व विशेष समजेल आणि वाढेल सुद्धा.

मकर - चिकाटीने आणि चिवटपणे केलेल्या गोष्टींचा आज मोबदला मिळण्याचा दिवस आहे. सहकाऱ्यांच्या सहकार्याने पुढे जाल. मान मिळेल.

कुंभ - सेवा, उपासना आज फलदायी ठरेल. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. लांबच्या प्रवासाचे आयोजन नियोजन सुरळीतपणे पार पडेल.

मीन- उशाला धोंडा असा काहीसा दिवस आहे. कष्ट आणि काबाडकष्ट यामध्ये व्यस्त राहाल.यश हुल देऊन जाईल. महत्त्वाची कामे आज नकोच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT