horoscope  Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; ५ राशींचे लोक संधीचं सोनं करणार, वाचा

Saturday Horoscope in Marathi : आज काही लोकांना पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागेल. तर ५ राशींचे लोक संधीचे सोनं करतील.

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,३० ऑगस्ट२०२५,भाद्रपद शुक्लपक्ष

तिथी-सप्तमी

रास- तुला ०७|५३ नं. वृश्चिक

नक्षत्र-विशाखा

योग-ऐंद्र योग

करण-गरज

दिनविशेष-विशाखावर्ज्य

मेष - सुखी संसाराची स्वप्न रंगवली आहेत ती आज साकार होण्याचा दिवस आहे. पण आपल्या राशीचे असणारे गुण जसे अचानक तापटपणा याच्यावर आज नियंत्रण मिळवा. कोर्टाच्या कामातही यश मिळेल .

वृषभ - जोडीदारासाठी पैसा खर्च करावा लागेल. कदाचित घरातील लोकांसाठी किंवा स्वतःसाठी आरोग्याच्या तक्रारी आज निर्माण होतील. सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील. काळजी घ्यावी.

मिथुन - श्रीकृष्ण उपासना फलदायी ठरेल.क्रीडा क्षेत्रामध्ये संततीकडून तसेच मनोरंजनाबाबत विशेष चांगल्या वार्ता आज कानी येतील.धनयोग उत्तम आहेत.

कर्क - घरी पाहुण्यांचे आगमन होईल. मन प्रसन्न राहील. आईकडून विशेष वात्सल्य आणि जिव्हाळा मिळेल. दिवस चांगला आहे. तो सार्थकी लावा.

सिंह - निधड्या छातीने कामे कराल.आलेल्या सर्व संधीचे सोने करायचे ताकद आज तुमच्या मध्ये आहे.वेगळाच पराक्रम कराल. भावंडांचे सहकार्याने पुढे जाल.

कन्या - अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांच्या चर्चा आणि निर्णय आज सुरळीत होतील. घरातील ज्येष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल. हिशोब ठेवणे खर्चाचा ताळमेळ साधणे याकडे आज विशेष लक्ष द्या.

तुळ - वास्तविक पाहता इतरांना समजून घेणारी आपली रास. मात्र आज तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यायला विशेष आवडेल. आपल्या धुंदीत आणि आनंदात जगण्याचा आजचा दिवस आहे. उमेद आणि उत्साह वाढता राहील.

वृश्चिक - काही दिवस राहिलेले सोपस्कार आज पूर्ण करा. रेंगाळत राहिलेली कामे आज पूर्ण होतील .मनस्थिती सांभाळून पाऊलवाट काढावी लागेल. काळजी घ्या.

धनु - काही दिवसांपूर्वी केलेले गुंतवणुकीचे आज फायदे होतील. मग ती मैत्री असो स्नेहबंध असो.अर्थात आर्थिक गुंतवणूक साठी अनेक लाभ घेऊन आलेला आजचा दिवस आहे.

मकर - सातत्याने काम करणे सामाजिक क्षेत्रात हिरीरीने सहभाग घेणे आपल्या राशीला आवडते. आज अशाच गोष्टी होतील. कामाचा आवाका वाढता राहील.

कुंभ - नातवंड सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपल्या जवळच्या लोकांच्याकडून सुवार्ता कानावर येतील. तुमच्या यशाची दालने आपोआप उघडतील. शिव उपासना करा.

मीन - काळा पैसा पासून सावध रहा. आपल्या साध्या स्वभावाला फसवणुकीचे आज योग आहेत. नको त्या मोहाला बळी पडू नका. मात्र नेटाने काम करत रहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded : कष्टाने उभा केलेला संसार पाण्यात बुडाला; नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्त महिलांना अश्रू अनावर

Tanya Mittal: 'आंघोळीसाठी इतकी तयारी...; तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगेंची शिंदे समितीसोबत चर्चा निष्फळ

Manoj Jarange : ज्या मागण्या मान्यच होणार नाही, अशा मागण्यांसाठी जरांगे उपोषणाला बसले आहेत - चंद्रकांत पाटील

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला धक्का! बड्या नेत्याची नाराजी उघड; थेट राजीनामाच दिला

SCROLL FOR NEXT