Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Horoscope: सहा राशींवर शनि महाराजांची कृपा; संकटं होतील दूर, आर्थिक लाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Saturday Horoscope In Marathi: ८ नोव्हेंबर २०२५ चे राशीभविष्य सर्व राशींसाठी खास असेल. मेष, तूळ, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. तुमचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.

Anjali Potdar

शनिवार,८ नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष,संकष्ट चतुर्थी.

तिथी-तृतीया ०७|३३

चतुर्थी-२८|२६

रास-वृषभ ११|१४ नं. मिथुन

नक्षत्र-मृग

योग-शिव

करण-विष्टीकरण ०७|३३

बवकरण १७|५५

दिनविशेष-क्षयतिथी

मेष

कुटुंबीयांमधील मोठ्यांच्या सल्ल्याने आज वागणे जास्त योग्य ठरेल. व्यवसाय नोकरी बाबत अडचणी आल्या तरी सुद्धा त्यातून मार्ग काढू शकाल. पैशाची निगडित व्यवहार होतील.

वृषभ

कला क्षेत्रात आघाडी मिळेल. नव्याने एखादी गोष्टी सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सकारात्मकता वाढेल. आपला प्रभाव राहील.

मिथुन

मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नको असणाऱ्या गोष्टींचा ससेमिरा मागे लागेल. काळजी घ्यावी.

कर्क

नव्याने स्नेहबंध निर्माण होतील. घरातील जवळच्या नातेवाईकांकडून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमामध्ये मात्र आपले वजन राहील .

सिंह

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. राजकारणामध्ये नव्याने घटना घडतील. मानसन्मान पैसा प्रतिष्ठा यामध्ये भरघोस यश मिळेल. दिवस चांगला आहे प्रवास होतील.

कन्या

विष्णू उपासनेने मनोरथ पूर्ण होतील. देवस्थळी भेटी होतील. यशासाठी वेगळी काहीतरी चळवळ करावी ज्यामधून योग्यतो मार्ग निघेल

तूळ

धावपळ खटपट करून यश मिळवावे लागेल. कोणाच्या सहकार्याची आज अपेक्षा नको. खर्च करताना मात्र मोजून मापून करा. अचानक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

जोडीदाराबरोबर अबोला संभवतो आहे. एकमेकांना समजून घेऊन आज कामे करावी लागतील. व्यवसायामध्ये मात्र चांगल्या गोष्टीत सहज बाजी मारण्याचा आजचा दिवस आहे.

धनु

रोग आजार, हितशत्रू, कर्ज, कटकटी, नोकरी मधील त्रास यांनी दिवस भरलेला आहे. थोडसं मनाची उभारी ठेवल्यासच दिवसभ बरा राहील. परिस्थितीशी दोन हात करावे लागतील.

मकर

अबोल्यामध्ये प्रेम वाटेल. मोठ्या गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. संततीकडून आशा देणाऱ्या वार्ता येतील. जेणेकरून दिवसाचे सार्थक वाटेल. आज संकष्टी चतुर्थी गणेश उपासना लाभदायी ठरेल.

कुंभ

घरामध्ये पाहुण्यांचा आगमन होईल. एखादी नव्याने खरेदी घरी होईल. वाहन सौख्य, गृह सौख्य, मातृसौख्य सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस चांगला आहे.

मीन

जवळचे प्रवासातून फायदा आहे. शेजाऱ्यांचे योग्य ते सहकार्य आज मितीला मिळेल. प्रेमामध्ये लाभ होतील. दिवस सुखकर आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT