Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Mercury changes sign twice December: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बुध धनु राशीत आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मकर राशीत गोचर करणार आहे. बुधाच्या या दुहेरी गोचरामुळे काही राशींच्या कुंडलीत पैसा मिळण्याची शक्यता आहे.
Budh Gochar
Budh GocharSaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये परिवर्तन करतात. यामध्ये बुध ग्रहाचा देखील समावेश आहे. बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, गणित या सर्व घटकांचा कारक मानलं जातं. त्यामुळे बुध ग्रहाच्या चालीत होणाऱ्या प्रत्येक बदलाचा प्रभाव या क्षेत्रांवर स्पष्टपणे दिसून येतो.

असंच येत्या डिसेंबर महिन्यात बुध ग्रह दोन वेळा राशी बदल करणार आहे. यावेळी तो धनु आणि वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि मंगळ राशींमध्ये बुधचा गोचर काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींचा चांगले दिवस येणार आहेत ते पाहूयात.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाचं दोनदा गोचर अनुकूल ठरणार आहे. बुध ग्रह या राशीच्या नवम आणि अष्टम भावात भ्रमण करणार आहे. या दिवसांत तुमची आर्थिक बाजू बळकट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सामाजिक स्तरावर सन्मान प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये नवीन प्रोजेक्ट्स, पदोन्नती किंवा मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.

Budh Gochar
Lucky zodiac signs: 12 महिन्यांनी सूर्य बनवणार डबल राजयोग; 'या' 3 राशींचा बँक बॅलन्स वाढणार, करियरमध्येही होणार प्रगती

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाचं गोचर लाभदायक ठरू शकणार आहे. हा प्रवास आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. मित्रमंडळी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील आणि एखादी शुभ बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.

Budh Gochar
Navpancham Rajyog 2025: 10 ऑगस्टपासून 'या' राशींचं नशीब पालटणार; मंगळ-यम बनवणार शक्तीशाली नवपंचम राजयोग

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचं राशी परिवर्तन सकारात्मक ठरू शकणार आहे. बुध ग्रह या राशीच्या कर्म भाव आणि नवम भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे कामकाजात प्रगती होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये स्थैर्य आणि आर्थिक वृद्धी होणार आहे. त्याचप्रमाणे नोकरीत असलेल्या व्यक्तींना अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

Budh Gochar
Kendra Trikon Rajyog: मंगळ ग्रहाने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' ३ राशींसाठी श्रीमंतीचा मार्ग होणार खुला

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com