शनिवार,६ सप्टेंबर २०२५,भाद्रपद शुक्लपक्ष,अनंत चतुर्दशी.
तिथी-चतुर्दशी२५|४२
रास- मकर ११|२२ नं. कुंभ
नक्षत्र- धनिष्ठा
योग-अतिगंड
करण-गरज
दिनविशेष-चांगला दिवस
मेष
कष्ट आणि मेहनत जोरकस राहून कामांमध्ये प्रगती गाठाल. राजकारणामध्ये मोठ्या व्यक्तीच्या सल्लागार होण्याचे योग आहेत. धाडस आणि धडाडी वाढेल.
वृषभ
दिवसाची इतीश्री शुभ वार्तानी होईल. अनंत चतुर्दशीचा दिवस आहे विशेष गणेश उपासना आपल्याला फलदायी ठरेल. तीर्थक्षेत्रे भेटी होतील. दिवस चांगला आहे.
मिथुन
नको असलेले सोपस्कार आज लांब ठेवलेले बरे. मनाला काय वाटतंय यापेक्षा बुद्धीचा कौल घेऊन कामे करा. अडचणी आणि अडथळे मार्गात रोवलेले आहेत पळवाट मात्र शोधू नका. चुकीशी दोन हात करावे लागेल.
कर्क
धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढेल. सामाजिक क्षेत्रामध्ये पुढाकार घ्याल. काही महत्त्वाच्या बैठका आणि निर्णय आज मार्गी लागतील. व्यवसायिक जोडीदाराकडून फायदा दिसतो आहे.
सिंह
महत्त्वाचे जिन्नस आणि ऐवज आज जपणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी सावधगिरीने पावले उचला.श्रेयस आणि प्रेयस्स यातील कौल घेऊन मार्गक्रमण कराल तर दिवस बरा आहे.
कन्या
समोरच्याला बोलून गारद कराल. लॉटरीमध्ये आज नशीब आजमवायला हरकत नाही. नव्याने कलात्मक गोष्टी आज बहरून येतील. सृजनशीलता वाढेल. दिवस चांगला आहे. विष्णू उपासना करावी.
तूळ
अनंताची उपासना आपल्याला राशीला आज विशेष फल देणारी आहे. छोट्या धार्मिक कार्यामध्ये आनंदाने सहभाग घ्याल. घरात आणि बाहेर समतोलपणा साधून मार्गक्रमण कराल.
वृश्चिक
लहान प्रवास घडतील. चुकीच्या गोष्टींचे सोपस्कार आज नकोतच. भावंड सौख्य चांगले राहील. शेजारी संवाद राहील. जिद्द, चिकाटी आणि उमेद आजच्या दिवशी कायम राहणार आहे.
धनु
धन योगाला दिवस उत्तम आहे. प्रॉपर्टीशी निगडित, वारसा हक्काशी निगडित, सुवर्ण किंवा धनाशी संबंधित निर्णय आज होतील कुटुंबीयांच्या सहकाऱ्यांनी पुढे जाल.
मकर
शांत राहून आनंद शोधाल. आपल्यामध्येच सत्व शोधाल. तरी सुद्धा इतरांवर आपला प्रभाव राहील. बुद्धी आणि आणि श्रम यामध्ये आज श्रम स्वीकारून कामाला लागाल.
कुंभ
चोर चोरी, महत्त्वाच्या ऐवज गहाळ होणे, चोरीला जाणे या गोष्टींपासून आज सावध रहा. मनस्वी आनंद लुटण्याचा दिवस नाही. मनाला मुरड घालून काही गोष्टी करावे लागतील. दिवस संमिश्र आहे.
मीन
आपल्या मित्र-मैत्रिणींकडून चार चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. आनंदामध्ये भर पडेल. घरातील कार्यक्रमात विशेषतः असून जावयांच्या सहवासामध्ये सुखावून जाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.