
सप्टेंबर महिन्यात ५ राशींवर चढ-उतार येणार आहेत.
भूतकाळातील गोष्टींमुळे वाद उद्भवू शकतात.
पंचांगानुसार अनेक शुभ योग तयार झाले आहेत.
वैदिक पंचांगानुसार, सप्टेंबर महिन्याच्या पाचव्या दिवशी भाद्रपद माह शुक्ल पक्षाची त्रयोदशी आणि चतुर्दशी असणार आहे. यासह तसेच श्रावण नक्षत्र, धनिष्ठा नक्षत्र, शोभन योग, अतिगंड योग, कौलव करण आणि तैतिल करण होत आहे. मात्र शुक्रवारी देवी लक्ष्मीला समर्पित असल्याने कोणत्याही ग्रहाचे संक्रमण होणार नाहीये. परंतु अनेक राशींवर याचा चांगला प्रभाव पडणार आहे.
विवाहित जातकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गप्पा करताना किंवा चर्चा करताना काळजी घ्या. तसेच जुन्या आठवणींचा किंवा इतर घटनांचा पुन पुन्हा उल्लेख करू नका.
वृषभ राशीच्या लोकांनी वाद सोडवताना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा तुम्ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
विवाहित जातकांच्या जीवनात चढ-उतार येतील. काहीच्या जीवनात पहिल्या प्रेमाची एंट्री होणार आहे. त्यामुळे घरात कहल निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, त्याच्या मनात तुमच्याबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते.
या राशीचे जातकांसाठी आजचा दिवस जरा वाईट जाणार आहे. त्यांना छोट-छोट्या गोष्टींवर राग येईल. विवाहित जोडप्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
विवाहित लोकांनी त्यांच्या जोडीदारासमोर इतर कोणाशीही जास्त मोकळेपणाने बोलू नये. यामुळे तुमच्या आधीच्या प्रियकरामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल, ज्यामुळे तुमच्या नात्यावर परिणाम होईल.
अविवाहित कन्या राशीच्या लोकांना जुन्या मित्राकडून प्रेम मिळू शकते. तर विवाहित जोडप्यांमधील नाते मजबूत होईल.
शुक्रवारी अविवाहित लोक नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी पहिले पाऊल उचलू शकतात. दुसरीकडे, विवाहित लोक त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व वाईट आठवणी विसरून त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील.
विवाहित जोडप्यांमधील प्रेम वाढेल. जुन्या आठवणींना उजाळा देतील. ज्यांचे ब्रेकअप झाले आहे, त्यांचे पुन्हा सूत जुळण्याची शक्यता आहे.
विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदारासोबत त्यांच्या मनातील भावना शेअर करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. जर अविवाहित व्यक्ती खरोखरच एखाद्यावर प्रेम करत असतील तर दिवसाच्या सुरुवातीला त्यांच्याशी बोलणे चांगले राहील.
मकर राशीमधील जे जातक अविवाहित आहेत, त्यांना परत एकदा त्यांना ब्रेकअपचा सहन करावा लागेल. त्यांना एकटेपणा जाणवेल, त्यामुळे नैराश्यात जातील.
वैवाहिक जीवनात परिस्थिती अनुकूल राहील. जुने वाद तुम्हाला त्रास देणार नाहीत किंवा नवीन समस्या उद्भवणार नाहीत. अविवाहित लोकांना शुक्रवारचा दिवस चांगला नसेल.
या राशीच्या जातकांसाठी शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. जातकांनी वर्तनात आणि बोलताना सावधानगिरी बाळगणं आवश्यक आहे. जोडीदारासह वाद होण्याची शक्यता आहे. प्रेमी जोडप्यांमध्ये कोणत्याही कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.