Weekly Horoscope: मेष, मिथुन, धनु राशींना सप्ताह फायद्याचा
Weekly Horoscope: मेष, मिथुन, धनु राशींना सप्ताह फायद्याचा - Saam TV
राशिभविष्य

Weekly Horoscope: मेष, मिथुन, धनु राशींना सप्ताह फायद्याचा

Amit Golwalkar

मेष : रवी-गुरू युतीयोगातून या सप्ताहात ग्रहांचे फिल्ड प्रकाशमान होणार आहे. अर्थात अमावस्येच्या या सप्ताहात! बुद्धीजिवी मंडळींना अफलातून ग्रहमान राहील. मोठे मानसन्मान. कृत्तिका नक्षत्रास ता. 3 मार्च 2022 चा गुरुवार मोठ्या सुवार्तांचा.

वृषभ : रोहिणी नक्षत्रास रवी-गुरू आणि बुध-शनी यांचे योग मोठे चमत्कार घडवतील. कोर्टप्रकरणे सुटतील. वास्तुविषयक व्यवहार होतील. घरातील तरुणांचे भाग्योदय. सप्ताहाची सुरुवात छानच. अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात प्रवासात सांभाळा. कृत्तिका व्यक्तींनी भावाबहिणीशी जपून राहावे.

मिथुन : रवी-गुरू युतीयोगाचे फिल्ड प्रचंड क्रियाशील राहील. न बोलता कामे करून घ्या. आर्द्रा नक्षत्रास सप्ताह पूर्वसंचितातून लाभ देईल. बॅंकेची कर्जमंजुरी. विशिष्ट भूखंड सोडवाल. वारसाहक्काचे प्रश्‍न सुटतील. नोकरीत वरिष्ठांची कृपा. पुनर्वसू व्यक्तींना अमावस्या दैवी प्रचितीची. खरेदीत जपा.

कर्क : अमावस्येच्या पार्श्‍वभूमीवर जुने वाद उकरून काढू नका. घरी वा दारी राजकारण टाळा. बाकी -- सहयोगाची साथ राहीलच. घरातील तरुणांच्या चिंता संपतील. ता. 3 मार्च ते ता. 5 मार्च 2022 हे दिवस शुभग्रहांच्या मोठ्या कनेक्‍टिव्हिटीचे. तरुणांच्या छान मुलाखती. पुनर्वसू व्यक्तींचा भाग्योदय. पुष्य नक्षत्रास गुंतवणुकींतून लाभ

सिंह : रवी-गुरू सहयोगाचे पॅकेज अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात गुप्तधनाचा लाभ देईल. अर्थातच पूर्वसंचित फळाला येईल. उत्तरा नक्षत्राचे नैराश्‍य जाईल. मात्र अमावस्या संसर्गाची. काळजी घ्या.

कन्या : सप्ताहातील ग्रहयोग मोठे अपवादात्मक राहतील. उत्तरा नक्षत्रव्यक्तींना मंगळ-शुक्र सहयोगातून अफलातून लाभ. मुलाखतींतून यश. हस्त नक्षत्रास वास्तुयोग. प्रेमप्रकरणं फुलतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या मौजमजेचा.

तुला : रवी-गुरू योगाची पार्श्‍वभूमी अमावस्येच्या या सप्ताहात मोठी दैवी प्रचितीची राहील. विशिष्ट प्रतीक्षा संपेल. नोकरीतील विशिष्ट गुप्तचिंता जाईल. चित्रा व्यक्ती मोठ्या कलंदर होतील. विशाखा नक्षत्रास अमावस्या सन्मानाची. मात्र घरातील वृद्ध जपा.

वृश्‍चिक : गृहिणींना सप्ताह छानच. नवपरिणितांचे भाग्योदय. अनुराधा नक्षत्रास सप्ताहाची सुरुवात मोठ्या बॅटिंग फिल्डची. सरकारी कामे. नोकरीत बदलीतून लाभ. ज्येष्ठा नक्षत्रास सप्ताहाचा शेवट मानसन्मानाचा.

धनु : सप्ताहातील रवी-गुरू सहयोगाची पार्श्‍वभूमी मानसिक पर्यावरण उत्तम ठेवेल. माणसांचा प्रेमळ सहवास. मूळ नक्षत्रास दिव्य प्रचिती मिळेल. नोकरीतील जडणघडणीतून उत्तम लाभ. पूर्वाषाढा नक्षत्रास सतत अर्थपुरवठा. ता. 3 ते ता. 5 फेब्रुवारी 2022 हे दिवस एकूणच इम्युनिटी देणारे.

मकर : राशीतील ग्रहांचा गोलयोग आणि रवी-गुरू युतीयोगाची पार्श्‍वभूमी भक्तांना महाशिवरात्रीजवळ दैवी प्रचिती देईल. श्रवण व्यक्ती आत्मतृप्त होतील. उत्तराषाढा व्यक्तींना संतांचे आशीर्वाद मिळतील. तिर्थाटनांतून आनंद. सप्ताहाचा शेवट धनिष्ठा नक्षत्रास उत्सव-प्रदर्शनांतून नेणारा. सखीचा सहवास!

कुंभ : राशीच्या व्ययस्थानातील ग्रहांची गर्दी वैचारिक गोंधळ करू शकते. मात्र रवी-गुरू (युतीयोगाच्या पार्श्‍वभूमीवर श्रद्धा बळकट ठेवा. ता. 2 व ता. 3 मार्च 2022 हे दिवस गुरूबळातून तारून नेणारे. शततारका व्यक्तींना ता. 3 ते ता. 5 मार्च 2022 हे दिवस चिंतामुक्त करणारेच. धनिष्ठा व्यक्तींनी घरात वाद टाळावेत. आजचा रविवार पूर्वाभाद्रपदास सन्मानाचा.

मीन : सप्ताहातील ग्रहयोगांची मालिका आपणास सांभाळून घेणारीच. उत्तराभाद्रपदा नक्षत्रास परिस्थितीजन्य लाभ होतील. सरकारी धोरणांतून लाभ. नोकरीत वरिष्ठांचा अनुग्रह. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रास सप्ताहाच्या शेवटी मोठे धनलाभ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT