TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : जोडीदारासोबत वाद टाळा; 5 राशींची पैशांची चणचण मिटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha : 12 राशींच्या व्यक्तींचा रविवार कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य.

Sakshi Sunil Jadhav

मेष : आज जोडीदारासोबत समजूतदारपणे वागण्याची गरज आहे. व्यवसायात लाभ होईल, आर्थिक फायदाही होऊ शकतो. पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरले.

वृषभ : आज आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. पण पैशांचा खर्च कुठे होत आहे याकडे लक्ष द्या, कारण वाढते खर्च मानसिक ताण देऊ शकतात. जोडीदाराची साथ मिळेल आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी सुद्धा निर्माण होऊ शकतात.

मिथुन : आज मनात चढ-उतार जाणवू शकतात, त्यामुळे संयमाने निर्णय घ्या. बौद्धिक कामांमुळे मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीसोबत परदेशात जाण्याची संधी मिळू शकते आणि उत्पन्नात वाढ होईल.

कर्क : आजचा दिवस सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि शिक्षण तसेच अभ्यासाशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते. मित्रांच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याचेही संकेत आहेत.

सिंह : आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होऊ शकते. आत्मविश्वासात काहीशी कमतरता जाणवली तरी मन प्रसन्न राहील. व्यवसायासाठी कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळू शकते आणि संततीकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या : जुन्या आजारातून आराम मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वाद टाळा आणि मित्रांसोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसाय आणि आर्थिक स्थिती समाधानकारक राहू शकते.

तुळ : आज कामाच्या ठिकाणी व्यस्तता वाढेल. पैशांशी संबंधित एखादा प्रश्न चिंता वाढवू शकतो, त्यामुळे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता असली तरी नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील.

वृश्चिक : आज आरोग्य चांगले राहील, पण आई-वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्या. गरज पडल्यास जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत घ्यावी लागू शकते. वादग्रस्त विषयांपासून दूर राहिल्यास दिवस अधिक चांगला जाईल.

धनु : आज स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वाढते खर्च मानसिक ताण वाढवू शकतात, मात्र आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी दिवस अनुकूल असून जवळच्या व्यक्तीची भेट होऊ शकते.

मकर : आज भावनिक अस्थिरता जाणवू शकते, त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आरोग्य आणि आर्थिक बाबतीत काही अडचणी येऊ शकतात. घरातील वातावरण शांत राहील आणि कार्यालयात एखादा आनंददायी सरप्राइज मिळू शकतो.

कुंभ : आज तुमचे नवे विचार कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू शकतात. मात्र, सहकाऱ्यांच्या कारस्थानांपासून सावध राहा. सध्या केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देऊ शकते आणि आर्थिक स्थिती सामान्य राहील.

मीन : आज मित्रांची साथ मिळेल आणि आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

डिस्क्लेमर : वरील राशिभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून ते सामान्य माहिती म्हणून दिले आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक असेलच असा दावा करण्यात येत नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ; नेमके प्रकरण काय?

Facebook Down : फेसबुक अचानक बंद! युजर्सचे लॉग-इन होईना, नेमकं काय घडलं? लगेच क्लिक करून वाचा...

Raigad History: कोकणात आढळले पुरी साम्रज्याचे अस्तित्व; ब्रिटिशकालीन शिलालेखातून पुरी संप्रदायाच्या इतिहासावर नवा प्रकाश

Maharashtra News Live Update: शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

High cholesterol: डोळ्यांमध्ये ही 3 मोठे बदल दिसले तर समजा रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालीये चरबी

SCROLL FOR NEXT