Sunday horoscope today Saam TV Marathi
राशिभविष्य

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Rashi Bhavisha : १२ राशींच्या व्यक्तींचा रविवारचा दिवस कसा असणार? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण राशीभविष्य .

Sakshi Sunil Jadhav

मेष : आज शुभ गोष्टी कानावर पडतील. कुटुंबातल्या मोठ्यांचे सहकार्य आणि आर्थिक मदत मिळू शकते. एखाद्या खास व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे.

वृषभ : आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रयत्नांना यश मिळेल. नोकरीची परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल आणि मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

मिथुन : आज आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. नोकरीत परदेशात जाण्याची संधी मिळू शकते आणि उत्पन्न वाढू शकते.

कर्क : आज आत्मविश्वास चांगला राहील, मात्र संयम ठेवणे आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवा आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढू शकतो आणि कुटुंबासोबत प्रवासाची संधी मिळू शकते.

सिंह : आजचा दिवस काहीसा तणावपूर्ण राहू शकतो. मित्राचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो, तर उधार पैसे देणे टाळा. व्यवसायात प्रगतीची शक्यता असून जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या : आज मोठ्या व्यक्तींनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंध चांगले राहतील आणि वैवाहिक जीवनासाठी दिवस खास ठरू शकतो.

तुळ : आज जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कामात उत्साह राहील आणि दिवस आनंदात जाईल. पैसे खर्च करताना काळजी घ्या, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : आज प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये चांगला वेळ मिळेल. जमिनीशी संबंधित कामासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळेल आणि व्यवसायाची स्थिती मजबूत राहील.

धनु : आजचा दिवस आनंददायी आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी दिवस अनुकूल आहे. जोडीदारासोबत वेळ घालवता येईल आणि व्यवसायात सुधारणा होईल.

मकर : आज जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा; प्रवास आणि व्यवसायासाठी दिवस लाभदायक आहे.

कुंभ : आज आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ऑफिसमधील राजकारण आणि आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता होऊ शकते आणि अचानक प्रवास करावा लागू शकतो.

मीन : आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे, मात्र आरोग्याची काळजी घ्या. अविवाहितांना प्रेम मिळू शकते आणि विवाहितांना जोडीदारासोबत चांगला वेळ मिळेल.

डिस्क्लेमर: या राशीभविष्यातील माहिती सामान्य स्वरूपाची असून ती पूर्णपणे अचूक असेलच असे नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रक्तदाब अचानक वाढल्यास शरीर देते हे 8 संकेत; जाणून घ्या वेळेत कसे ओळखायचे?

Breast Cancer Treatment: ब्रेस्ट कॅन्सरचा महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? उपचारानंतरही जाणवतात या समस्या

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

World Unique Places : कुठे गुलाबी तलाव, तर कुठे आरशासारखे वाळवंट; जगातील 'ही' ७ अनोखी ठिकाणे पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Best time to fill CNG: सकाळी की संध्याकाळी? कारमध्ये CNG भरण्याची कोणती आहे बेस्ट वेळ?

SCROLL FOR NEXT