Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : आजचे राशीभविष्य, अंदाज आज अचूक ठरतील, कष्टाचे होईल चीज; तुमच्या भाग्यात आज काय?

Anjali Potdar

आजचे पंचांग - बुधवार ९ ऑक्टोबर २०२४ अश्विन शुक्लपक्ष. तिथी-षष्ठी १२|१५. रास-धनु. नक्षत्र-मूळ. योग-सौभाग्य ०६|३७. शोभन २९|५३. करण-तैतिल. दिनविशेष-चांगला दिवस.

मेष - एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपला कोणावरही विश्वास बसत नाही. आज तो ठेवूच नका. कोणाचेही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आजचे उद्या झाले म्हणजे "आभाळ कोसळणार नाही" हे विचारात घ्या.

वृषभ - नवीन दिशा, नवीन मार्ग, नव्या काही गोष्टी ज्या कामाशी निगडित असतील अशा समोर येतील आणि त्या संधी तुम्ही घ्यालच. काही कामे जी आहेत ही एकटेपणाने तर एकटेपणाने पण धाडसाने पार पाडाल.

मिथुन - हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे योग्य सहकार्य लाभेल पण कोणावरही अतिविश्वास नको."आस्ते चलो" हे लक्षात ठेवा.

कर्क - आर्थिक क्षेत्रामध्ये सुसंधी लाभणार आहेत. शासकीय कामे रेंगाळली असतील तर आज ती मार्गी लागतील. संततीकडून सुवार्ता समजतील. आपल्या नशिबावर आपण खुश होऊन जाल.

सिंह - तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरतील. प्रवास होतील आणि ते प्रवास सुखकर होतील. या प्रवासा मधून नवे परिचय, ओळखी होतील आणि कामाची व्यापकता वाढेल.

कन्या - जिद्द आणि चिकाटी या गोष्टी आपल्यात आहेतच. बुद्धिमत्ता ही देवाने दिलेली एक विशेष देन तुमच्याकडे आहे. या जोरावर व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणणार हिशोबी स्वभाव असल्यामुळे जुनी येणी वसूल करण्याच्या मागे लागाल आणि ती वसूल होतीलही.

तूळ - आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आपली मते इतरांनी ऐकावीत असे वाटेल. कदाचित ती त्यांच्या फायद्याची असतील म्हणून त्या मताविषयी तुम्ही आग्रही राहाल. दिवस चांगला जाईल.

वृश्चिक - आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस पाहिला तर चांगला राहील. राशीप्रमाणे तशी तुमची रास सहनशील आणि खंबीर आहे. आज अशाच काही गोष्टी होतील आपल्या मतांविषयी आपण आग्रही राहाल आणि ठरवेल तेच कराल.

धनु - "आला गेला मनोगते" ही अशी पैशाची अवस्था राहील. खर्चाचे प्रमाण वाढलेले असेल. दैनंदिन कामे उगाचच नीट वेळेत होणार नाहीत ती कामे रखडतील आणि कटकटी वाट्यास येतील.

मकर - तशी आपली रास शांत आणि धीमी आहे. फार लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही. पण आज काही नवीन परिचय होतील आणि हे परिचय घट्ट बंधामध्ये रूपांतरित होतील. महत्त्वाच्या गोष्टी पत्रव्यवहार मार्गी लागतील.

कुंभ - तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुमची उंची वाढणार आहे. एकूणच उत्साह, उमेद, आत्मविश्वास महत्त्वाकांक्षा या सर्व गोष्टी वाढीस लागतील. चांगल्या घटना, सुवार्ता कानी येतील. कामाचे चीज होईल.

मीन - नोकरीमध्ये समाधानकारक गोष्टी घडतील. एखादी घटना जी भाग्य कारक आहे अशी आपल्या वाट्यास आज येईल. स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ होईल. सद्गुरु भेटतील. गुरु उपासना करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेनेची मुंबईत आज दसरा मेळावा आढावा बैठक

Maharashtra Politics : भाजप १५५ जागांवर ठाम, शिवसेना-राष्ट्रवादीला किती जागा?

Maharashtra Politics: 'आप'चा मोर्चा पुण्याकडे, सर्व जागा लढवणार, मविआला फटका बसणार?

RBI FD Interest Rate: RBI आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, एफडीवरील व्याजदरात कपात होणार?

Amravati Crime: एकाच तरुणावर दोघींचा जीव जडला! तरुणीने सपासप वार करुन दुसरीला संपवलं; बॉयफ्रेंडसाठी भयंकर कांड

SCROLL FOR NEXT