RBI FD Interest Rate: RBI आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, एफडीवरील व्याजदरात कपात होणार?

RBI Descision On Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आज बैठक होणार आहे. त्यामध्ये रेपो रेट वाढणार की कमी होणार याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
RBI FD Interest Rate
RBI FD Interest RateSaam Tv
Published On

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेट निश्चित करते. रेपो रेटवर बँकाच्या एफडीचे व्याजदर अवलंबून असते. जर रेपो रेटमध्ये वाढ झाली तर एफडीतील व्याजदरात वाढ होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूकीमुळे एफडीमध्ये गुंतवणूक कमी झाली आहे.

मागील महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसी रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सने घट झाली होती.त्यामुळे आता भारतीय रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज रेपो रेटवर निर्णय घेणार आहे. (Reserve Bank Of India Repo Rate)

RBI FD Interest Rate
New Internship Scheme: लाडक्या बहिणीनंतर आता भावांचा नंबर, तरुणांना दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या कसे?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल २०२३ पासून रेपो रेट ६.५० टक्के ठेवला आहे. जर आरबीआयने रेपो रेटमध्ये घट केली तर त्यावर मिळणारे व्याजदरदेखील कमी होते. त्यामुळे आता एफडीमध्ये गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. सध्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्याजदर

देशातील अनेक फायनान्स बँका सध्या ९ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. अशातच जर RBI रेपो रेटमध्ये घट झाली तर व्याजदरदेखील कमी होऊ शकते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष रिझर्व्ह बँकेच्या आज होणाऱ्या बैठकीकडे आहे. (Interest Rate)

RBI FD Interest Rate
Unified Pension Scheme : काय आहे यूनिफाइड पेन्शन स्कीम; योजनेचा लाभ केव्हापासून घेता येणार?

एफडीवरील व्याजदर

मिडिया रिपोर्टनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्याजदरात बदल करु शकते.सध्या बँका ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्के व्याजदर देते. जर रेपो रेटमध्ये कपात केली तर हे व्याजदर कमी होऊ शकते. पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर बँका सध्या ८ टक्के व्याजदर देत आहे. (FD Interest Rate)

RBI FD Interest Rate
Post Office Scheme : दररोज ३३३ रुपये जमा करा अन् लाखोंचा परतावा मिळवा; पोस्ट ऑफिसने आणली नवी योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com