Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : मेष ते मीन, सप्टेंबरचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय? वाचा आजचे राशीभविष्य...

Rashi Bhavishya Today 30 September 2024 :दैनिक पंचांग - सोमवार ३० सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. सोमप्रदोष शिवरात्रि. मेष ते मीन, सप्टेंबरचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय? वाचा आजचे राशीभविष्य

Anjali Potdar

दैनिक पंचांग - सोमवार ३० सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. सोमप्रदोष शिवरात्रि. त्रयोदशी श्राध्द. तिथी- त्रयोदशी १७|०७. रास-सिंह. नक्षत्र-पूर्वा. योग-शुभयोग. करण-वणिज. दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य.

मेष - आपल्यामध्ये असलेली ऊर्जा आज अजूनच वाढेल. द्रुतगती प्रवास घडतील. वेगाने गाडी चालवावे वाटेल. पण सावध रहा. डोके थंड ठेवून कामे कराल तर योग्य राहील.

वृषभ - आपल्यामधील रसिकता आज बहरेल. कामाबरोबर त्या कामाचा आनंदाने लुटाल. कला क्षेत्रामध्ये प्रगतीचे योग आहेत. सहकाऱ्यांना बरोबर घेऊन वाटचाल कराल.

मिथुन - मैत्रीचे बंध दृढ होतील. आपल्याला इतरांची मदत मिळेल. प्रेमाच्या गोष्टी वाढीस लागतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क - आपल्या स्वभावाचा इतर जण फायदा घेतात, अशी जाणीव आज होईल. मनस्वास्थ्य थोडे खराब राहील. उदास मानसिकता असेल. थोडे अलिप्त राहिलात तर बरे होईल.

सिंह - आपल्या अपेक्षा उंचावतील. कामाला विशेष एक वेग येईल. इतरांवर आपला पडणार आहे आजचा दिवस आपल्यासाठी आहे हे धरून चला. यश तुमचेच आहे.

कन्या - कुटुंबीयांबरोबर वेळ घालवावा असे वाटेल. घरामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल. जुन्या गोष्टींमध्ये मन रमेल. इतरांना आपलेसे कराल.दिवस चांगला जाईल.

तूळ - जुने रखडलेले पत्रव्यवहार मार्गी लागतील. छोटे प्रवास घडतील. शेजारी मैत्रीपूर्ण वातावरण राहील. नवीन ओळखी होतील. सगळ्यांना समजून घेऊन पुढे वाटचाल कराल.

वृश्चिक - गाई, गुरे, शेती, घर, गाडी याच्या व्यवधानामध्ये रहाल. सगळ्यांसाठी काहीतरी करण्यामध्ये आज आपला दिवस व्यस्त असेल. मातृ सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला.

धनु - प्रेमाला नवे पंख फुटतील. ठरवलेल्या गोष्टी होताना आज दिसेल. प्रणयामध्ये रंग भराल पैशाची आवक चांगली राहील. उपासनेच्या दृष्टीने दिवस फलदायी आहे.

मकर - अडचणींचा डोंगर वाढता असेल. विनाकारण आपल्यावर आळ येतील. नोकरीमध्ये कष्ट वाढतील. दमणूक आणि धावपळीचा आजचा दिवस आहे.

कुंभ - व्यवसायामध्ये नवीन बदल करावेसे आज वाटेल. याविषयी महत्त्वाच्या बैठका होतील किंवा एखाद्या नवीन दालनामध्ये आपण प्रवेश कराल. प्रगतीच्या दृष्टीने पुढील वाटचाल करा. यामध्ये जोडीदाराचे सुद्धा सहकार्य मिळेल.

मीन - आपल्या भोळेपणाचा फायदा घेतला जाईल. आपल्याला इतर लोकं म्होरके करतील आणि त्यांची कामे साध्य करतील. आजचा दिवस सावधगिरीचा इशारा देणारा आहे. काही गोष्टींना नाही म्हणायला शिका तेच बरे असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा; पुण्यातल्या महिलेचा अजित पवारांना सकाळीच सल्ला

IND vs PAK : भारताला मोठा धक्का, पाकिस्तानविरोधात भिडण्याआधीच हुकमी एक्का दुखापतग्रस्त, सूर्याचं टेन्शन वाढलं

Pune DCM Ajit Pawar : पुण्यातील वाहतूककोंडी पाहायची आहे? मनोहर पर्रिकरांसारखे तुम्हीही शहरात फिरा, अजित पवारांना महिलेचा सल्ला

Moong Dal Dhokla Recipe : पचायला हलका अन् चवीला सुपरटेस्टी; रविवारी नाश्त्याला बनवा मूग डाळीचा ढोकळा

Shcoking: धक्कादायक! बहिणी मावशीच्या घरी निघाल्या, नराधमांनी दोघींवर जंगलात केला सामूहिक बलात्कार, भयानक कृत्यानंतर मोबाईल घेऊन पसार

SCROLL FOR NEXT