Daily Horoscope Today Marathi  Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : हरतालिका तृतीयेला या राशीच्या सुख-समृद्धीत होणार वाढ, पैशांची होईल बरसात, वाचा राशीभविष्य

Horoscope Today 6th September 2024 : आजचे राशीभविष्य, हरितालिका तृतीया. तिथी-तृतीया १५|०२. हरतालिकेला या राशीच्या सुख-समृद्धीत होणार वाढ, पैशांची होईल बरसात.

Anjali Potdar

दैनिक पंचांग शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४. भाद्रपद शुक्लपक्ष. हरितालिका तृतीया. तिथी-तृतीया १५|०२. रास-कन्या २३|०१ नं. तुला. नक्षत्र-हस्त. योग-शुक्लयोग. करण-गरज. दिनविशेष-शुभदिवस.

मेष - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रूप्रीडा नाही. अध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. थोड्या आजाराने कटकटी वाढतील पण त्या बाजूला सारून ठेवा. आजचा दिवस याचा विचार करण्याचा नाही.

वृषभ - आर्थिक क्षेत्रामध्ये लाभ होईल. कलाक्षेत्रात संधी लाभेल. कलाकारांना मानसन्मान प्रसिद्धीचे योग आज आहेत. मन रमवण्याचा प्रयत्न कराल. हरतालिका व्रत स्त्रियांनी करावे.

मिथुन - राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लागेल. एकूण खर्च किती केला याचा हिशोब ठेवता लागेल. खर्चाचे प्रमाण खूप वाढते राहील.

कर्क - जिद्द आणि चिकाटी याच्यामुळे स्वबळावर अनेक गोष्टी जिंकाल. नातेवाईकांचे सहकार्य आपल्याला फायद्याचे ठरेल. शेजाऱ्यांची मदत मिळेल.

सिंह - व्यवसायात नवीन तंत्र मंत्र आणाल.कौटुंबिक जीवनामध्ये समाधान साधण्याचा आजचा दिवस आहे. पैशाचे व्यवहार आज मार्गी लागणार आहेत असे दिसते आहे.

कन्या - तुमचा इतरांवर आज प्रभाव राहणार आहे. ठरवलेली दैनिक कामे योग्यरीत्या मार्गी लागतील. कोणत्याही निर्णय घेताना फक्त दोलायमान स्थिती टाळावी असा आजचा सल्ला आहे.

तूळ - कोणाचेही सहकार्याची अपेक्षा न करता कामाला लागा. काही जणांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. विनाकारण मनस्ताप टाळा.

वृश्चिक - महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडणार आहेत. मित्र-मैत्रिणींच्या सहवासाने दिवस दुधात साखर पडणार आहे. दिवस छान राहील.

धनु - तुमचे कार्यक्षेत्र रुंदावणार आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढ. ठरलेल्या गोष्टी मनाप्रमाणे होतील. प्रवास होतील.

मकर - एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. धार्मिक कार्यामध्ये आपला सहभाग होईल. हरितालिकेची उपासना विशेष फलदायी ठरेल. शिव पार्वतीचा जप करावा.

कुंभ - महत्वाची कामे शक्यतो आज नकोत. प्रवासही टाळावेत. सर्व गोष्टी कामे करताना सावधगिरीने वागावे. अमाप पैसे मिळवण्याच्या नादात शरीर आणि मनाचे नुकसान नको.

मीन - आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधता येईल. विवाह उत्सुक उमेदवारांचे विवाह होतील. विशेष आनंदी वार्ता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

SCROLL FOR NEXT