Daily Horoscope Today Marathi  Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : या राशींच्या व्यक्तींसाठी शनिवार ठरणार खूपच लकी, वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग - शनिवार १४ सप्टेंबर २०२४ भाद्रपदशुक्लपक्ष. परिवर्तिनी एकादशी. तिथी-एकादशी २०|४२. रास-मकर. नक्षत्र-उत्तराषाढा. योग-शोभन करण-वणिज. दिनविशेष-१० प. चांगला

मेष - करिअरवर आज लक्ष केंद्रित करावे.ज्यांना काही बदल करावासा वाटत असेल ते आज करिअरमध्ये बदल करू शकता. अस्थिरता दिसत आहे. कामासाठी प्रवास घडतील.

वृषभ - विनासायास काही गोष्टी सहज घडतील. आपल्या नशिबात लिहिलेले कुठेच जात नाही आणि कधी कमी पडत नाही याची प्रचिती आज येईल. देवावरचा विश्वास दृढ होईल.

मिथुन - अचानक धनलाभासाठी मोठ्या गोष्टींची रिस्क आज घेऊ नका. कुठल्याही कामांमध्ये कागदोपत्री साक्षीदार राहणे अथवा सह्या करणे आज टाळावे.

कर्क - आपण चुका केल्या नसल्या तरी काही गोष्टींची सुखदु:खे आपल्याला भोगावी लागतात. विनाकारण अंगावर आलेल्या गोष्टी कोर्टकचेरीच्या माध्यमातूनच निपटाव्या लागतील.

सिंह- नोकरीच्या शोधात असाल तर आज त्याच्यासाठी वाटा मिळतील.नवीन संधी येतील असे वाटते आहे. आयुष्यामध्ये मेहनतीला पर्याय नाही हे आज जाणवेल.

कन्या- संततीच्या कौतुकात गुंतून जाल. नव्या काही सृजनशील गोष्टी आपल्याकडून घडतील. शिक्षणा व्यतिरिक्त इतर क्षेत्रात आज आघाडी राहील.

तुळ - घराविषयी विशेष आकर्षण निर्माण होईल. नीटनेटकेपणा, टापटीपणा, नव्या काही गोष्टी खरेदी करावी आणि घर सुंदर ठेवावं अशी भावना होईल. पाहुणे येतील.

वृश्चिक - स्वतःची ताकद आणि अवका ओळखा. तो खूपच मोठा आहे. आज मोठी आव्हाने घेऊ शकता. कुणाच्या मदतीशिवाय पुढे जाण्याचा दिवस आहे.

धनु - पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. परिवाराचे आज सहकार्य चांगले राहील. दिवस चांगला आणि आनंदी आहे.

मकर - विनाकारण चिंता आणि कटकटी आज तुम्ही ओढवून घेणार नाही. मनामध्ये चांगले विचार राहतील. खूप दिवसांनी आज उल्हासित वाटेल.

कुंभ -"कशासाठी पैशासाठी" असा आजचा दिवस आहे. जितके मिळतील तेवढी त्याला गळती आहे. म्हणून कधी कधी कंजूसपणा फायदेशीर ठरतो. तो आजचा दिवस आहे.

मीन - सहज सुलभ असा आजचा दिवस आहे. आनंदाची परिसीमा गाठाल. जुन्या आठवणीमध्ये मन रमून जाईल. दिवस चांगला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT