सोमवार,७ एप्रिल २०२५,चैत्र शुक्लपक्ष.
तिथी- दशमी २०|०१
रास-कर्क
नक्षत्र-आश्लेषा (अहोरात्र)
योग- धृति
करण-तैतिल
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - गाड्यांची विशेष आवड आपल्याला आहे. आजच्या या दिवशी आपल्याला नवीन वाहन खरेदी किंवा चांगल्या वाहनांमधून फिरण्याचे योग येतील. "सुख आले दारी" अशी भावना राहील. दिवस चांगला आहे.
वृषभ - बहिणीची विशेष माया आणि प्रेम आज लाभेल. भाग्याला पराक्रमाची जोड असेल तर यश आपलेच असते हे जाणवेल. कलंदर वृत्तीने आयुष्य जगण्याचा संकल्प आज कराल.
मिथुन - "इथून तिथून मिथुन" असा दिवस आहे. आपल्याला एक वेगळ्या कामात वर्चस्व मिळेल. कुटुंबीयांच्या मध्ये खेळीमेळीचे वातावरण ठेवण्यात आज आपण दुवा असाल.दिवस चांगला आहे.
कर्क - "आनंदाचे डोही आनंद तरंग" असा काहीसा दिवस आहे. तसंही आपली साधी आणि सात्विक असणारे रास छोट्या गोष्टीत आनंद मिळणारी आहे. आज स्वतःमध्ये आनंद शोधाल आणि स्वस्थ रहाल.
सिंह - "ये रे माझ्या मागल्या" अशी अवस्था राहील. विनाकारण त्रास कटकटी वाढतील. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी कराव्या लागतील. मनस्थिती सांभाळून पुढे जावं लागेल. खर्चाला मात्र धरबंद राहणार नाही.
कन्या - मैत्रीचा दुवा हा सर्व गोष्टीचा त्रास विसरणारा असतो. सहजगत्या इतरांना आपलेसे करावे. नव्याने परिचय होतील. मैत्री वृद्धिंगत होईल. एकत्रित रित्या स्नेहभोजनाचे योग आहे.
तूळ - पैशासाठी सर्व काही हे आपल्याला माहिती आहेच. धावपळ असेल, तरीसुद्धा दिवस सार्थकी लागेल. आपल्यालाआपल्या कामाचे वेगळेपण सिद्ध करून दाखवायला आवडते आणि ते आज नक्की कराल.
वृश्चिक - कुलस्वामिनीची उपासना करावी. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना घडतील. नातवंड सौख्य चांगले. सृजनशीलता वाढेल. उपासनेवर दृढविश्वास होईल. सद्गुरु भेटतील. दिवस चांगला आहे.
धनु - "तळ्यात मळ्यात" असा काहीसा दिवस राहिल. ठरवलेल्या गोष्टी तशाच घडतील असं वाटत नाही. पण कोणाचेही मदतीची अपेक्षा न करता पुढे जावे लागेल. कामाचा व्याप वाढता राहील.
मकर - अनेक दिवस केलेल्या गोष्टींचे नियोजन आज सफल होईल. आपल्या कामाचा आराखडा पक्का आणि साचेबद्ध असतो. व्यवसायात भागीदाराबरोबर हातात हात घालून काम कराल. यशस्वी दिवस आहे.
कुंभ - तब्येतीच्या तक्रारी मागे लागतील. जुन्या काही गोष्टी, जुने आजार पुन्हा डोके वर काढतील. आपले महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस यांच्यावर विशेष नजर ठेवा. दिवस बरा आहे.
मीन - दत्त उपासना आज फलदायी ठरेल. नवीन गोष्टी कामामध्ये सुचतील. विद्या, कला, क्रीडा, संततीसौख्य, धन या दृष्टीने दिवस खूप छान जाईल. एक वेगळी उर्मी आणि चैतन्य जाणवेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.