Horoscope Today  Saam tv
राशिभविष्य

Horoscope: प्रेमात यश अन् धनयोग; भाग्यकारक आहे शुक्रवार, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस?

Horoscope Today in marathi : अनेकांना लाभ देणारा दिवस आहे. तर काहींना मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. शुकवारचा दिवस कसा असेल हे जाणून घेऊ.

Anjali Potdar

शुक्रवारी,१८ एप्रिल २०२५ चैत्र कृष्णपक्ष,गुडफ्रायडे

तिथी-पंचमी १७|०८

रास-वृश्चिक ०८|२१ नं. धनु

नक्षत्र-ज्येष्ठा०८|२१

योग-परिघ

करण-तैतिल

दिनविशेष-८ नं.चांगला

मेष

जोडीदारासाठी पैसे खर्च करावे लागतील. मनासारख्या गोष्टी होण्यासाठी झगडावे लागेल. उष्णतेचे विकारांच्याकडे आज दुर्लक्ष नको.

वृषभ

कामाच्या ठिकाणी प्रगतीचा भास होईल. व्यावसायिक गोष्टी धीरोदत्तपणेपणे घ्याव्या लागतील. कोर्टाच्या कामात मात्र सहज यश मिळेल. दिवस संमिश्र आहे.

मिथुन

लांडी लबाडीने आज कामे नकोत. स्वतःचा इमान राखून काम करा. खोट्या गोष्टीत अडकण्याची आज दाट शक्यता आहे. कुठेही कागदपत्रावर सही किंवा साक्षीदार राहू नका.

कर्क

प्रवासातून फायदा होईल. भाग्यकारक घटनांचा आजचा दिवस आहे. मनस्थिती सुखद राहील. परिस्थितीत बदल होईल. दिवस चांगला आहे.

सिंह

सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. एक वेगळी पत आणि आदर समाजामध्ये आपला वाढेल. मान सन्मानात भर पडेल. एकट्याने कामे केलेल्याचा आज फायदा होईल. दिवस चांगला आहे.

कन्या

भरून पावलो अशी भावना होईल. अनेक प्रकारचे लाभ होतील. परदेशी वार्तालाप होईल. परदेशी मित्रांपासून आज फायदा होईल. दिवस चांगला आहे.

तुळ

प्रेमात अडथळे येतील. नाहक मनस्ताप सहन करावा लागेल. विनाकारण पैसा खर्च झाल्यामुळे मानसिकता बिघडेल. बंधन योग दिसत आहेत.

वृश्चिक

अनेक लोकांचे काम एकट्याने करण्याचे आज बळ येईल. आनंदी आणि स्वच्छंदी जीवन जगण्यामध्ये सार्थकता मनाल. इतरांना आपला आधार वाटेल.

धनु

आनंदी घरकुल अशी आजची संज्ञा आहे. कुटुंबीयांबरोबर उत्साहाचे क्षण व्यतीत कराल. खाण्याची मांदियाळी राहील. धनाची आवक उत्तम राहिल्यामुळे मन समाधानी राहील.

मकर

जवळच्या प्रवासातून फायदा आहे. त्याचबरोबर आपले जिन्नस आणि ऐवज सुद्धा संभाळा. शेजारी सहकार्य करतील. भावंड सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

कुंभ

गाईगुरांमधून फायद्याचा दिवस आहे. बाग, बागायती, शेतकऱ्यांसाठी दिवस बहारदार ठरणार आहे. घरी नवीन वस्तूंची खरेदी होईल.

मीन

दत्त उपासना फलदायी ठरेल. संततीकडून चांगल्या वार्ता कामाला कानावर येतील. प्रेमात यश मिळेल. धनयोगाला दिवस उत्तम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT