Horoscope Today  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : भगवान शंकराची कृपा होणार; कर्कसह ५ राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार, मिळणार नुसता पैसाच पैसा

Horoscope Today in Marathi : आज भगवान शंकराची कृपा होणार आहे. आज सोमवारी कर्कसह ५ राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार आहे. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,१७ फेब्रुवारी २०२५,माघ कृष्णपक्ष.

तिथी- पंचमी २८|५४

रास- कन्या १८|०३ नं. तुला

नक्षत्र- चित्रा

योग- शूल

करण- कौलव

दिनविशेष- उत्तम दिवस

मेष - हितशत्रूंचे त्रास आणि त्याचा ससेमिरा आपल्याला सहन करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शक्यतो पित्तविकार आणि डोकेदुखी यापासून सावधगिरी बाळगावी.

वृषभ - कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी मिळतील. आर्थिक गुंतवणूक सुध्दा फायदेशीर आणि समाधानकारक ठरेल. देवी उपासनेच्या माध्यमातून धनप्राप्तीचे योग आहे.

मिथुन - राहत्या जागेचे प्रश्न मिटणार आहेत. त्याचे व्यवहार सुद्धा होतील. घरी धार्मिक कार्य होईल. पाहुण्यांची ऊठबस राहील. वाचन संस्था, चळवळ यात भाग घ्याल.

कर्क - व्यवसायामध्ये वाढ होईल. रखडलेली कामी आज मार्गी लागतील. जसे की पत्रव्यवहार, महत्त्वाच्या बैठका ई .जवळचे प्रवास होतील.

सिंह - महत्वाची बातमी कानावरील येईल. दैनंदिन कामांमध्ये हिरेरीने सहभाग घ्याल. धन योगाच्या दृष्टीने दिवस वेगळी आशा घेऊन आलेला आहे.

कन्या - जोडीदाराची साथ चांगली लाभेल. आपले व्यक्तिमत्व उठावदार राहील तसा प्रभाव इतरांवर पडेल. दिवस चांगला आणि आनंदी आहे.

तूळ - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. पण आपला वेळ आणि पैसा वाया जाण्याची दाट शक्यता आहे. परदेश गमनाच्या योगासाठी महत्त्वाच्या बैठका होतील.

वृश्चिक - आर्थिक क्षेत्रात केलेले धाडस आज फळाला येईल. महत्त्वाच्या गाठीभेटी, जुने मित्र, नातेवाईक यांच्या संगतीने दिवस चांगला राहील.

धनु - नोकरी व्यवसायात नियोजित केलेली कामे त्याच पद्धतीने घडतील. एकूणच समाधान काय असते ते राहिल्यामुळे नवीन ऊर्जा दिवसासाठी मिळेल. दिवस व्याप्त आणि व्यस्त असेल.

मकर - आज विष्णू उपासना आपल्यासाठी फलदायी ठरेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. सुवर्ता कानावर येतील. दिवस आनंदी आहे.

कुंभ - कोणाचेही सहकार्याची आज अपेक्षा नको. दमणूक धावपळ वाढेल. खर्चही वाढतील पण त्याचबरोबर काही जणांना अचानक धनलाभाची सुद्धा शक्यता आहे. व्यस्त असा आजचा दिवस असेल.

मीन - आपली मतं आणि आपले नियोजन यावर आज तुम्ही ठाम राहाल.भागीदारी व्यवसाय मध्ये आपली आगेकुछ राहील. एकूणच सुयश मिळण्याचा आजचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT