आजचे पंचांग
सोमवार,१६ डिसेंबर २०२४,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,धनुर्मासारंभ.
तिथी-प्रतिपदा १२|२८
रास- मिथुन
नक्षत्र-आर्द्रा
योग- शुक्लयोग
करण-कौलव
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - प्रियकराबरोबर थोडे मतभेद होतील. मनभेद नाही. दिवस चांगला राहील. जपलेली नाती वृद्धिंगत होताना दिसून सुख वाटेल.
वृषभ - कलेची तुम्हाला विशेष कदर आहे, आकर्षण, आसक्ती याही गोष्टी आहेत. आजच्या दिवशी मात्र मनोरंजन, कला, क्रीडा याच्यासाठी नाहक खर्च होताना दिसून येत आहे.
मिथुन - आपली हुकूमत, आपली ऐट, आपले व्यक्तिमत्व हे आपल्या बोलण्यामध्ये आहे. आज या गोष्टींमधून आपली देहबोली बहरेल. स्वतःच स्वतःला खुलवणे अशा गोष्टी आज घडतील.
कर्क - लक्ष्मी चंचल आहे असे आज भासेल. मना सारख्या गोष्टी करण्यासाठी खर्च कराल. पण मनासारख्या गोष्टी मिळवण्यासाठी सुद्धा धडपडाल. पाहुण्यांचे आगंतुक आगमन होईल.
सिंह - भावंडांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. पण त्याचे श्रेय आज आपल्याला मिळून जाईल. पराक्रमात भर पडेल. जवळचे प्रवास घडतील. विशेष सन्मान प्राप्त होतील.
कन्या- घरी भरभराट होईल. शेती, बागायती याचे उत्पन्न मधून विशेष फायद्याचा आज दिवस आहे. आईच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी. सुख आले दारी असे वाटेल.यासाठी विजय कष्ट आणि मेहनत घ्याल.
तूळ- शेअर्समधील पैसा फायद्याचा ठरेल. कदाचित लॉटरी असून धन योगाची शक्यता सुद्धा दाट आहे. विशेष विष्णू उपासना केल्यास फलदायी ठरेल. संतती सुखाची पताका फडकावून जाईल.
वृश्चिक- हाताखालच्या लोकांकडून त्रास संभवतो आहे. कार्यक्षेत्रामध्ये अवघड जबाबदारी अंगावर पडतील. सगळ्यांना सांभाळून घेण्यात आज आपले कसब पणाला लागेल.
धनु - "एकमेका सहाय्य करू" असा आजचा दिवस आहे. व्यवसायामध्ये घरामध्ये भागीदार आणि जोडीदार यांबद्दल योग्य समन्वय साधल्यास दिवस समाधानाचा राहील.
मकर - कष्टाला पर्याय नाही. काही गोष्टी स्वतः शिवाय इतर कोणी करू शकत नाही हे आपल्या लक्षात येईल. दैनंदिन कामांमध्ये अडथळे आले तरी हार न मानता आज पुढे जात रहा.
कुंभ - कर्म आणि देव यामध्ये जर निवड करण्याचे वेळ आली तर आजच्या दिवशी आपल्या कर्मामध्ये दैवत्व शोधाल. आणि कामात पुढे जाल. शिव उपासना दिवसाचे फल द्विगुणीत करण्यात मदत करेल.
मीन - प्रवासा मधून फायदा संभवतो आहे. आज जोडलेली नाती किंवा ओळखीचे परिचय या तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी मदतीची ठरतील. दिवस चांगला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.