Horoscope Today 1 august  Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya Today : महिन्याचा पहिला दिवस चांगला राहील, नोकर लोकांपासून सावधान; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

today horoscope in marathi : महिन्याचा पहिला दिवस चांगला राहणार आहे. तसेच नोकर लोकांपासून सावधगिरीने राहिले पाहिजे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचाग - गुरुवार दिंनाक १ ऑगस्ट २०२४

आषाढ,कृष्णपक्ष,प्रदोष तिथी- द्वादशी १५|३० पर्यंत. रास-मिथुन. नक्षत्र-मृग. योग- व्याघातकरण- तैतिल. दिनविशेष- १५.प चांगला

मेष - आजचा दिवस चांगला राहील.

एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे ताकतीने आणि जिद्दीने पुढे जाल. सर्वांशी सहमत घेऊन कामाची आखणी कराल. दिवस चांगला राहील.

वृषभ - आजच्या दिवशी मनस्तापाच्या गोष्टी टाळा

काहींचा अध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन काम रखडण्याची शक्यता दाट दिसते आहे. मनस्ताप टाळा.

मिथुन - आजचा दिवस सकारात्मक राहील

तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल.प्रसिद्धी मिळेल. हातामध्ये जे घेतलेले काम आहे त्याच्यामध्ये यश मिळेल. दिवस सकारात्मक राहील.

कर्क - मंत्र व्यवसायात अमलात आणाल.

नवीन तंत्र आणि मंत्र व्यवसायामध्ये करिअरमध्ये अमलात आणाल. पैशांशी निगडित असणारे व्यवहार असतील तर पूर्ण होतील.

सिंह - तुमचे छोटे प्रवास घडतील

महत्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले आणि समाधानकारक राहील. छोटे प्रवास घडतील.

कन्या - शासकीय कामे पूर्ण होतील

तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आघाडी मिळवाल. मान प्रतिष्ठा मिळेल. शासकीय कामे असतील तर ती आज मार्गी लागतील.

तूळ - तुम्हाला गुरुकृपा लाभेल

गुरुकृपा लाभेल धार्मिक कार्यात आपण हिरीरीने सहभागी व्हाल. शेअर्समध्ये फायद्याचा आजचा दिवस आहे.

वृश्चिक - मनोबल कमी होईल

मनोबल कमी राहील. वादविवाद टाळावेत. नोकर लोकांपासून सावधगिरीचा आजचा दिवस आहे.

धनु - दैनंदिन कामे पूर्ण होतील

आपल्या मताविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गे लागतील. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे.

मकर - नोकरीत दिवस चांगला जाईल

हित शत्रूंवर मात कराल. नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आजची वाट कामासाठी खाच खळग्यांची राहणार आहे.

कुंभ - परदेशात जाण्याचा योग येईल

धर्म, अध्यात्मात गती राहील. उपासना फळाला येईल. परदेशात जाण्याचे योग लवकरच आहेत त्याची आखणी कराल. दान व दानत चांगली ठेवा.

मीन - वरिष्ठांचं सहकार्य लाभेल

तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील मोठ्यांचे सहकार्य लाभेल. मोठ्या प्रवासाची आखणी कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

६० लिटर पाण्यात ९०० किमी धावणार कार? इराणच्या वैज्ञानिकाचा व्हिडिओ व्हायरल, वाचा नेमकं सत्य काय

रात्री झोपताना मोजे घालून झोपल्यास मृत्यू होतो?

Maharashtra Road Accident : ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर; वेगवेगळ्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Washim : चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी; शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उबाठाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT