Trigrahi Yog  saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog: अनेक वर्षांनी तयार होतोय त्रिग्रही योग; 'या' राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, कामातील अडथळे दूर होणार

Trigrahi/Grah Gochar 2025: 2025 मध्येही काही मोठ्या ग्रहांचं गोचर होणार आहे. ज्यामुळे सुमारे 50 वर्षांनी गुरूच्या मीन राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. या योगामध्ये शनी, बुध आणि सूर्य यांचं गोचर होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एका राशीमध्ये दोन किंवा तीन ग्रहांचा संयोग होतो. 2025 मध्येही काही मोठ्या ग्रहांचं गोचर होणार आहे. ज्यामुळे सुमारे 50 वर्षांनी गुरूच्या मीन राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. या योगामध्ये शनी, बुध आणि सूर्य यांचं गोचर होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य 29 मार्च 2025 रोजी न्याय देणारा शनी स्वतःच्या कुंभ राशीतून बाहेर पडून देवगुरू बृहस्पतिच्या राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध 28 फेब्रुवारीला मीन राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय याचवेळी सूर्य देखील मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 50 वर्षांनंतर मीन राशीमध्ये सूर्य, बुध आणि शनी यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

धनु रास

तीन ग्रहांचं गोचर आणि त्रिग्रही योग राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. भौतिक सुख-सुविधांमध्ये धर्म आणि अध्यात्माची आवड वाढण्याची शक्यता आहे. वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होणार आहे.

मीन रास

तीन ग्रहांचं गोचर आणि त्रिग्रही योग राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकणार आहे. समाजात मान-प्रतिष्ठा वाढणार आहेत. भागीदारीच्या कामात लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तीला लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुख, शांती राहणार आहे.

मिथुन रास

तीन ग्रहांचं गोचर आणि त्रिग्रही योग राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतात. या काळात बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरदारांना बढती आणि वेतनवाढीचा लाभ मिळू शकतो. करिअरसाठी काळ अनुकूल राहणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Leopard Attack: चिमुकलीचा दुर्दैवी बळी; बिबट्यांच्या हल्ल्यांनी हादरलं महाराष्ट्र

Travel Insurance Tips: फ्लाइट रद्द होऊ द्या नाहीतर बॅग हरवू द्या; इन्शुरन्स असेल तर 'डोन्ट वरी', Travel Insurance साठी आत्ताच करा अर्ज

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT