Rare 6 Planet Alignment saam tv
राशिभविष्य

शनि, सूर्य आणि शुक्रासह ६ ग्रहांचा होणार संयोग; 'या' राशींना मिळणार चहुबाजुंनी पैसा, भाग्य उजळणार

Grah Gochar: मार्च महिन्यातही असाच एक दुर्मिळ योगायोग घडणार. यावेळी मीन राशीत ६ ग्रह एकत्र असणार आहेत. यावेळी काही राशींना त्यांच्या कामाचं चांगलं फळ मिळणार आहे, तर काहींना त्यांचे अडकलेले पैसे मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या राशीमध्ये एका ठराविक काळानंतर गोचर करतात. या काळात इतर ग्रहांशी होणारे संयोग अनेक प्रकारचे दुर्मिळ योगायोग निर्माण करतात. ज्यावेळी ग्रहांचं संयोजन तयार होतं त्यावेळी त्याचा परिणाम सर्व लोकांच्या जीवनावर होताना दिसतो. मार्च महिन्यातही असाच एक दुर्मिळ योगायोग घडणार. यावेळी मीन राशीत ६ ग्रह एकत्र असणार आहेत.

राहू, शुक्र, शनि, बुध, सूर्य आणि चंद्र या ग्रहांचा यामध्ये समावेश आहे. मार्च महिन्यात राहू आणि शुक्र आधीच मीन राशीत असणार आहेत. तर २९ मार्च रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध देखील आधीच मीन राशीत असेल आणि सूर्य १४ मार्च रोजी मीन राशीत असणार आहे. यानंतर चंद्र २८ मार्च रोजी मीन राशीत जाणार आहे. यामुळे २९ मार्च रोजी ६ प्रमुख ग्रह मीन राशीत एकत्र असतील.

दरम्यान मीन राशीत होणाऱ्या या ग्रहांच्या संयोगाचा परिणाम काही राशींच्या जीवनावर अधिक चांगला होणार आहे. यावेळी काही राशींना त्यांच्या कामाचं चांगलं फळ मिळणार आहे, तर काहींना त्यांचे अडकलेले पैसे मिळणार आहे. जाणून घेऊया यामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्यात ६ ग्रहांचे दुर्मिळ युती खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या मेहनतीची आणि नशिबाची चांगली साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या तुमच्या करियरमध्ये नवीन संधी मिळतील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी मीन राशीत 6 ग्रहांचं दुर्मिळ संयोजन येणाऱ्या चांगल्या दिवसांचं संकेत आहे. तुम्ही करत असलेला व्यवसाय पूर्वीपेक्षा वेगाने पुढे जाणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध अधिक दृढ होणार आहेत. यावेळी भागीदारीत चांगला नफा मिळण्याची संकेत आहेत. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

कुंभ रास

मार्च महिन्यात ६ प्रमुख ग्रहांच्या शुभ संयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांना महत्त्वपूर्ण लाभ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळू शकणार आहे. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात राजकीय उलथापालथ; पाहा VIDEO

पुण्यातील IT पार्क हिंजवडीत भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला धडक, तरूणी थेट चाकाखाली चिरडली

Beed Politics : बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट; कुठे असेल महायुती कुठे बिघाडी?

Maharashtra Live News Update: अकलूजमध्ये तिरंगी लढत; मोहिते पाटीलविरुध्द भाजप सामना

बीडमध्ये भाऊ -बहिणीची प्रतिष्ठा पणाला? संध्या देशमुखांच्या एन्ट्रीमुळे राजकीय तापमान वाढलं|VIDEO

SCROLL FOR NEXT