Budh Rahu Yuti 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Rahu Yuti: राहू-बुधाच्या युतीने चमकणार 'या' राशींचं आयुष्य; मिळणार छप्परफाड पैसा, नातेसंबंधही सुधारणार

Budh Rahu Yuti 2025: 27 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11:46 वाजता बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीमध्ये राहू आणि बुधचा संयोग होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने नववर्ष खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे या काळात अनेक ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. 2025 च्या सुरुवातीला राहू आणि बुधाचा संयोग होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, राहू आधीच मीन राशीत बसला आहे. 27 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11:46 वाजता बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीमध्ये राहू आणि बुधचा संयोग होणार आहे. या दोन ग्रहांचा संयोग सर्व राशींवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी काही राशींना राहू आणि बुध यांच्या संयोगाने विशेष लाभ मिळू शकणार आहेत.

वृषभ रास

ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 मध्ये राहू आणि सूर्याची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी खास आहे. येणारे नवीन वर्ष या राशींशी संबंधित लोकांसाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. करिअरमध्ये नवीन योजनांवर काम होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी वर्षाची सुरुवात चांगली राहणार आहे. परदेशातून आर्थिक लाभ होऊ शकतो.

तूळ रास

2025 मध्ये तूळ राशीच्या लोकांना राहू-बुधाच्या युतीमुळे विशेष लाभ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीसाठी भरपूर संधी मिळू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित कामात फायदा होऊ शकतो. नवीन वर्षात व्यवसायासाठी केलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत.

वृश्चिक रास

ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षात राहू-बुधाचा संयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीची ऑफर मिळू शकते. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळणार आहेत. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. नवीन वर्षात व्यवसायात भागीदारीतून लाभ होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT