Mahalakshmi Yog saam tv
राशिभविष्य

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Surabhi Kocharekar

एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार, नऊ ग्रहांमध्ये सर्वात वेगाने फिरणारा ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र हा एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. येत्या काळात चंद्र आणि मंगळाचा संयोग होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, सप्टेंबरच्या अखेरीस चंद्राचा मंगळाशी संयोग होणार आहे. यावेळी चंद्र आणि मंगळाच्या युतीने महालक्ष्मी नावाचा राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमुळे तुमची प्रगती होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमचा बँक बॅलन्स वाढवून तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला विशेष लाभ मिळू शकणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. तुमच्या कामाचा विचार करून काही मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येणार आहे.

कुंभ रास

या राशीमध्ये पाचव्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार असून या राशीच्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रात उच्च पदासह पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायाच्या बाबतीतही तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : बीडमधील मराठा समाजाकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

Rohit Sharma: अरे, झोपलेत का सगळे? चेन्नई टेस्टमध्ये भर मैदानात संतापला रोहित शर्मा, पाहा नेमकं काय घडलं?

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी! राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार, महत्वाची अपडेट आली समोर

Dhule Crime : प्रेयसीच्या कुटुंबाची मारहाण, प्रियकराचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Manoj Jarange : वडीगोद्री प्रकरणी जरांगेंचं मोठं वक्तव्य !

SCROLL FOR NEXT