Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

weekly horoscope health: या आठवड्यात काही राशींच्या लोकांनी विशेषतः आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहस्थितीमुळे काही राशींवर ताणतणाव, थकवा आणि लहानसहान आजारांचा प्रभाव दिसू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

सप्ताहातील चंद्र-गुरू युतीमुळे छोटे प्रवास, सहली, तीर्थयात्रा होतील. भावंडे, नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. घरातील वातावरण आनंद राहील. कायदेशीर कामासाठी वेळ व पैसा खर्च होईल.

वृषभ

आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल होतील. मोठी गुंतवणूक होईल. कुटुंबात आनंदाची घटना घडेल. सप्ताहात छोटे प्रवास, सहली होतील. शनी-मंगळ केंद्र योगामुळे सहकारी मित्र वर्गाशी मतभेद संभवतात.

मिथुन

मन आनंदी-उत्साही राहील. नवीन गोष्टी शिकण्याकडे कल वाढेल. धार्मिक विधी, उपासना होईल. नोकरी-व्यवसायातील कटकटी वाढतील. वैवाहिक जीवनात मनस्ताप-वादविवाद संभवतात.

कर्क

मोठे कर्ज मिळेल. सप्ताहातील शांती- मंगळाचा केंद्रयोग नोकरीमध्ये बदल-बदली करणारा राहील. हितशत्रूवर विजय मिळवाल. निवडणुकीत यश मिळेल.

सिंह

मोठी इच्छा पूर्ण होईल. मनासारख्या घटना घडतील. मोठ्या व्यक्तींचा परिचय-सहवास मिळेल. मित्रपरिवार नातेवाइकांकडून मदत मिळेल. वारसा हक्काच्या कामात कटकटी वाढतील.

कन्या

व्यापारात मोठी वाढ होईल. सामाजिक-राजकीय क्षेत्रात पद-प्रतिष्ठा वाढेल. निवडणुकीत यश लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

तूळ

तीर्थयात्रा-दानधर्म होईल. नावलौकिक-प्रसिद्धी मिळेल, पदवी, पुरस्कार मिळतील. सत्पुरुषांचा सहवास सत्संग घडेल. भावंडे-नातेवाइकांशी मतभेद संभवतात. नोकरीमध्ये कटकटी वाढतील.

वृश्चिक

लॉटरी, शेअर बाजारात पैसा मिळेल. छोटे प्रवास, यात्रा कराल. नोकरी-व्यवसाय बदल करण्याचे विचार येतील. मुलांसाठी खर्च करावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अपघात संभवतात.

धनू

वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. कोर्टकचेरीमध्ये मनासारखे निर्भय होतील. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. शनी-मंगळ केंद्र योगामुळे घर-जागेच्या कामात कटकटी संभवतात.

मकर

मोठे कर्ज मंजूर होईल. हितशत्रूचा उपद्रव कमी होईल. आर्थिक ताण वाढण्याची शक्यता राहील. भावंडे-नातेवाइकांचा त्रास सहन करावा लागेल. कोर्टकचेरी टाळावी.

कुंभ

शेअर बाजारात लाभ होईल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. मोठी इच्छा पूर्ण होईल. शनी- मंगळ केंद्र योगामुळे कुटुंबात कलहाचे प्रसंग उद्भवतील. जुन्या येण्याच्या वसुलीसाठी कटकटी होतील.

मीन

घराजवळ बदलीसाठी प्रयत्न होतील. घरात धार्मिक, मंगलकार्ये होतील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल, मोठ्या व्यक्तींचा पाहुणचार कराल. वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या महिला नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

Health Tips : सावधान! जेवणानंतरची एक चूक पडेल महागात,आताच सोडा 'ही' सवय

Rent Agreement: घरमालक-भाडेकरुंसाठी ५ नवे नियम, एकही मोडला तर होणार दंड, आताच नोट करा

CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

SCROLL FOR NEXT