Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

zodiac signs must take care of their health weekly: नवीन आठवड्याची सुरुवात झाली असून, या आठवड्यात काही ग्रहांचे संक्रमण आणि त्यांची अशुभ दृष्टी काही राशींच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

राजकीय, सामाजिक क्षेत्रात पत-प्रतिष्ठा वाढेल. निवडणुकीत यश मिळेल. मात्र मित्रांशी समज-गैरसमज होतील. अनपेक्षितपणे मोठे लाभ होतील. उत्तरार्धात मनाविरुद्ध खर्च करावे लागतील.

वृषभ

सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवास जपून करावेत. उत्तरार्धात नोकरी-व्यवसायात गोंधळाची स्थिती राहील. वरिष्ठांशी गैरसमज संभवतात.

मिथुन

सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तरुणांचे विवाह जमतील. वारसाहक्क, वडिलोपार्जित संपत्तीमधून लाभ होईल. नवीन संधी थोडक्यात हुलकावणी देतील.

कर्क

भागीदारीच्या व्यवसायाच्या संधी मिळतील. कोर्टकचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. निवडणुकीत विजय मिळेल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

सिंह

परदेशगमनाची संधी मिळेल. नोकरीत चांगले बदल-बदली होईल. नोकर-चाकरांचे प्रश्न सुटतील. उत्तरार्धात जोडीदारांशी समज-गैरसमज टाळावेत. निवडणुकीत फसवणुकीचे अनुभव येतील.

कन्या

घरात धार्मिक मंगलकार्य होतील, उत्तरार्धात संततीविषयी चांगल्या घटना घडतील, शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल. निवडणुकीत विजयासाठी अडथळे येऊ शकतात.

तूळ

नातेवाईक, भावंडांचा सहवास लाभेल. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. उत्तरार्धात मुलांशी मतभेद होऊ शकतात. शेअर मार्केटपासून दूर राहावे. प्रेमप्रकरणात मनस्ताप संभवतो.

वृश्चिक

गुंतवणूक फायदेशीर राहील. प्रसिद्धी-पुरस्कार मिळतील. नावलौकीक वाढेल. महत्त्वाची कागदपत्रे होतील. फसवणुकीपासून सावध राहावे. ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.

धनू

मोठी गुंतवणूक कराल. वारसाहक्क, वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल. उत्तरार्धात मोठे धाडसी निर्णय घ्याल. भावंडांशी गैरसमज टाळावेत. निवडणुकीत यश मिळेल.

मकर

तरुणांचे विवाह जमण्यासाठी उत्तम काळ राहील. उपासना, नवीन शिक्षणाची आवड निर्माण होईल. उत्तरार्धात गुंतवणूक जपून करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.

कुंभ

वस्त्र, अलंकार, उंची वस्तूंची खरेदी होईल. दूरच प्रवास होतील. परदेशगमनाची संधी मिळेल. मोठे खर्च होतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन

नोकरीमध्ये प्रमोशनची संधी मिळेल. उत्तरार्धात नवीन मित्र, सहकारी भेटतील. शेअर्ससारख्या व्यवसायात फायदा होईल. परदेशगमन, मोठे प्रवास लांबणीवर पडतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२८ वर्षाच्या महिला डॉक्टरने ९ व्या मजल्यावरून उडी मारली, महिन्याभरात होणार होतं लग्न, नेमकं झालं काय?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज त्र्यंबकेश्वरमध्ये सभा

8th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाची बातमी! बेसिक सॅलरी ₹१८००० वरुन ४४,२८० होण्याची शक्यता

Heavy Rain Alert : राज्यात थंडी ओसरली, 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार, वाचा हवामान विभागाचा इशारा

पंकजा मुंडेंच्या PA अनंत गर्जेच्या मुसक्या आवळल्या, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी कारवाई

SCROLL FOR NEXT