Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: या आठवड्यात काही राशींच्या व्यक्तींना नोकरीतून होणार फायदा; पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope: या आठवड्यातील राशीभविष्यानुसार, काही राशींसाठी हा आठवडा चांगला आहे, तर काही राशींसाठी काहीसा आव्हानात्मक असू शकतो. पाहा तुमचं राशीभविष्य.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

सप्ताहाच्या सुरुवातीला व्यवसायात नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-मंगळ प्रतियोगामुळे मित्र-परिवारासोबत समज-गैरसमज संभवतात, मित्रांशी, सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत.

वृषभ

चंद्र-गुरू शुभ योगामुळे नोकरी मिळू शकणार आहे. व्यवसायात चांगले बदल होतील. व्यापारात मोठा लाभ होईल. मात्र वरिष्ठांशी मतभेद संभवतात. घरातील वातावरण गरम राहील. पैशाची कामे काळजीपूर्वक करावीत.

मिथुन

आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-गुरू शुभयोगामुळे नावलौकीक मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रवेश मिळेल. चंद्र-मंगळ योगामुळे भावंडे, नातेवाइकांशी मतभेद संभवतात.

कर्क

सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-मंगळ योगामुळे कौटुंबिक वादविवाद संभवतात. बोलताना काळजी घ्यावी. मोठे खर्च होतील. उत्तरार्थात बदनामीपासून सावध राहावे.

सिंह

नोकरीमध्ये बदल-बदली होण्याची शक्यता राहील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मोठ्या पावसामुळे त्रास संभवतो. सर्दी, संसर्गजन्य विकार संभवतात.

कन्या

सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. गोंधळातून महत्त्वाची कामे होतील. चंद्र-गुरू शुभ योगामुळे नवीन नोकरी/व्यवसायाची संधी मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश मिळेल.

तूळ

घर-जागेसंदर्भातील कामे होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-गुरू योगामुळे मुलांच्या समस्या सुटतील. शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होईल.

वृश्चिक

सप्ताहाच्या सुरुवातीला भावंडे-नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. घर, जागा, वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. उत्तरार्धात शेअर, लॉटरीपासून नुकसान संभवते.

धनू

कौटुंबिक कामात वेळ जाईल. चंद्र-गुरू योगामुळे तरुणांचे विवाह जमतील. नातेवाईक-भावंडांचे सहकार्य उत्तम राहील. अपेक्षित निरोप किंवा पत्रव्यवहार होतील.

मकर

आरोग्याकडे लक्ष द्या. पैशाची कामे होतील. नोकरीमध्ये प्रमोशन, पगारवाढ होईल. नातेवाइकांमुळे मनस्ताप संभवतो. महत्त्वाच्या पत्रव्यवहार किंवा कायदेशीर कामात विलंब होईल.

कुंभ

कर्जाची कामे होतील. चंद्र-गुरू योगामुळे आरोग्य उत्तम राहील. मनस्थिती प्रसन्न राहील, मनासारख्या घटना होतील. मात्र उत्तरार्धात गुंतवणूक जपून करावी. पैशाची कमतरता भासेल.

मीन

मित्रांच्या गाठीभेटी होतील. परदेशगमनाची संधी मिळेल. व्हिसा-पासपोर्टची कामे होतील. हितशत्रूवर विजय मिळवाल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी. मोठ्या पावसामुळे त्रास संभवतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Tourism : मनसोक्त शॉपिंग अन् चौपाटीची भेळ, वीकेंडला करा दादरची सफर

आधी मसाला स्प्रे, मग शरीरावर चाकूनं वार, अभिनेत्रीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्यानं केला हल्ला

Shravan 2025: श्रावण महिन्यात दिल्लीतील 'या' रहस्यमय शिवमंदिरांना भेट द्यायला विसरू नका

Maharashtra Live News Update : तिरुवल्लर रेल्वे स्टेशनवर अग्नीतांडव, मालगाडीला भीषण आग

ठाकरे इम्पॅक्ट! मुंबईत फिरताना जपानी तरुण बोलतोय मराठीत; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT