Five Planet Conjunction In Mithun saam tv
राशिभविष्य

Panchagrahi Yog : 50 वर्षांनंतर बनणार पंचग्रही योग; 'या' राशींना मिळणार गुरु-शुक्राचा आशीर्वाद

Five Planet Conjunction In Mithun: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा पाच ग्रह एकाच राशीत किंवा एकाच घरात एकत्र येतात, तेव्हा त्याला 'पंचग्रही योग' असे म्हणतात. हा योग खूप दुर्मिळ मानला जातो आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. यामुळे राजयोगांची निर्मिती होते. यामध्ये त्रिग्रही आणि पंचग्रही योग तयार करतात. या सर्व राजयोगांना परिणाम राशींवर होत असतो.

येत्या काळात पंचग्रही योग ५० वर्षांनी तयार होणार आहे. हा योग २४ जून २०२५ रोजी मिथुन राशीत चंद्र, गुरू, बुध, शुक्र आणि सूर्य यांच्या युतीने तयार होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला नव्या संधीही मिळू शकणार आहेत.

तूळ रास

पंचग्रही योग या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हे योग तुमच्या राशीच्या नवव्या घरात राहणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत. हा काळ व्यवसायिक सौदे, सोशल नेटवर्किंग किंवा ग्रुप प्रोजेक्टसाठी चांगला आहे. यावेळी तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कन्या रास

पंचग्रही योगाची निर्मिती कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. तुमच्या गोचर कुंडलीत करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी तयार होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसाय केला तर नवीन करार आणि नफा मिळण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

वृषभ रास

पंचग्रही राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचं फळ मिळणार आहे. तुम्हाला करियरमध्ये चांगली संधी मिळू शकते. यावेळी तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे पण चांगले बदल घडणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाबा आढाव यांच्या निधनामुळे बुधवारी मार्केट बंद राहणार

Accident : अहमदपूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! दोन तरुणांचा मृत्यू; सीसीटीव्ही फुटेज समोर

Onion Storage Tips: कांद्यांना कोंब फुटतात? नरम पडतात? ही 1 सिंपल ट्रिक, महिना भर राहतील चांगले

Vande Bharat Express : १६० चा वेग, विमानासारखा अलिशान प्रवास, पहिली वंदे भारत स्लीपर या मार्गावर धावणार, तारीख नोट करा

Colon cancer: त्वचेवर दिसणारे हे संकेत दर्शवतात कॅन्सरचा धोका, वेळीच ओळखा चेहऱ्यावर दिसणारे बदल

SCROLL FOR NEXT