Numerology explores traditional beliefs about birth numbers, personality traits and relationships. saam tv
राशिभविष्य

'या' तारखेला जन्मलेला मुली असतात खडूस; भांडणात सासूबाईंची करतात बोलती बंद

Numerology and Relationships: अंकशास्त्रानुसार काही मूलांकांचा संबंध आत्मविश्वास, स्वतंत्र विचारसरणी आणि ठाम स्वभावाशी जोडला जातो. हे मूलांक कोणते महिलांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगतात ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • मूलांक १ चा संबंध नेतृत्वगुण आणि आत्मविश्वासाशी जोडला जातो.

  • मूलांक ८ चा संबंध चिकाटी, शिस्त आणि ठाम निर्णयक्षमतेशी जोडला जातो.

  • काही मूलांकांचा संबंध आत्मविश्वास, स्वतंत्र विचारसरणी आणि ठाम स्वभावाशी

अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाला विशेष महत्त्व असते. अंकशास्त्रामध्ये १ ते ९ या मूलांकांचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीचा मूलांक त्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दलची महत्त्वाची माहिती मिळू शकतो. अंकशास्त्रानुसार अत्यंत निर्भय, स्वतंत्र विचारसरणीच्या आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या महिलांशी संबंधित असे दोन मूलांक आहेत. या २ 'मूलांकांच्या' स्त्रिया जेव्हा सून म्हणून घरात येतात तेव्हा घराची सर्व सूत्रे त्यांच्याच हातात असतात. त्यांच्या सासूबाईंनाही अनेकदा त्यांची बरीच भीती वाटते. हे मूलांक कोणते आहेत, हे जाणून घेऊ.

मूलांक १

कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक १ असतो. या अंकाचा स्वामी ग्रह 'सूर्य' आहे, त्यामुळे या अंकाशी संबंधित व्यक्तींवर सूर्यदेवाचा विशेष प्रभाव असतो. सूर्याच्या या प्रभावामुळे मुलांक १ असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण आणि जबरदस्त आत्मविश्वास असतो.

अंकशास्त्रानुसार 'मूलांक १' असलेल्या सुना आपली कामे स्वतंत्रपणे करणे पसंत करतात. आपल्या स्वातंत्र्यात होणारा कोणताही हस्तक्षेप त्या सहन करत नाहीत. त्यांच्या सासू सहसा त्यांच्याबाबत सावध राहतात. त्या महिलांना काही आक्षेपार्ह वाटले तर त्या कोणत्याही संकोचाशिवाय आपले मतं थेट आणि स्पष्टपणे मांडत असतात. तसेच या मूलांकाच्या स्त्रिया आयुष्यात कोणाच्याही दबावाखाली राहणे सहन करू शकत नाहीत.

मूलांक ९

कोणत्याही महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मलेल्या महिलांचा मूलांक ९ असतो. या अंकाचा स्वामी ग्रह 'मंगळ' आहे. मंगळाच्या प्रभावामुळे या मूलांकाच्या व्यक्ती अत्यंत कष्टाळू, शिस्तप्रिय आणि स्वभावाने जिद्दी असतात. मूलांक ९ असलेल्या स्त्रिया आयुष्यात कोणाचेही वर्चस्व किंवा दबाव सहन करत नाहीत.

जेव्हा त्यांच्या सन्मानावर किंवा स्वाभिमानावर गदा येत असते तेव्हा त्या ठामपणे भूमिका घेत विरोध करतात. त्यांचा स्वभाव काहीसा रागीट असतो. सासरच्या घरी कोणी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्यास त्या त्वरित आणि कडक शब्दांत त्याला प्रत्युत्तर देत असतात.

महत्त्वाची टीप: वरील माहिती पारंपरिक ज्योतिषीय संकल्पनांवर आधारित सामान्य स्वरूपाची आहे. साम टीव्ही याला कोणत्याही प्रकारे दुजोरा देत नाही ना सहमत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

Minister resignation news: मला मंत्रिमंडळातून मुक्त करा! केंद्रीय मंत्र्यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र, पदाचा आणि खासदारकीचाही दिला राजीनामा

राहुल गांधींच्या निवासस्थानी 'चाय पे चर्चा', इंडिया आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? प्रमुख नेत्यांनी सांगितला पुढचा प्लान

Breast Cancer: पुरूषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, 'या' १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

मोठी बातमी! राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT