

अंकशास्त्रानुसार ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ६ मानला जातो.
मूलांक ६ असलेल्या व्यक्तींमध्ये आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि कलात्मक गुण असतात.
प्रेम, नातेसंबंध आणि सुख-सुविधांकडे या व्यक्तींचा कल असल्याचे अंकशास्त्र सांगते.
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचे स्वतःचे असे विशिष्ट महत्त्व असते. कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ६ असतो. हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. परिणामी अशा व्यक्तींमध्ये अनेकदा आकर्षक व्यक्तिमत्त्व, सौंदर्य आणि कला, प्रेम व सुख-सुविधांची आवड यांसारखे गुण असतात. मूलांक ६ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, प्रेमसंबंध आणि करिअरमधील संधी याबद्दल जाणून घेऊ.
अंकशास्त्रानुसार मुलांक ६ असलेल्या व्यक्ती साधारणपणे मिलनसार, आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आणि आनंदी स्वभावाच्या मानल्या जातात. त्यांना स्वच्छता, सुंदर गोष्टी आणि चांगली जीवनशैली आवडत असते. त्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. नेहमीच इतरांना मदत करण्यास तत्पर असतात.
इतकेच नाहीतर त्यांच्याकडे इतरांना आकर्षित करण्याची प्रभावी क्षमता असू शकते. मात्र सुख-सुविधा आणि चैनीच्या गोष्टींच्या सवयीमुळे ते कधीकधी पैशांची उधळपट्टी करत असतात. हा मुलांक असलेले लोक नातेसंबंधात खूप भावूक होत असतात. नातेसंबंधांमध्ये अति-भावूक होण्यामुळे काही वेळा समस्या निर्माण होत असतात.
अंकशास्त्रानुसार 'मूलांक ६' असलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व आकर्षक मानले जाते. संभाषणादरम्यान इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांच्याकडे सर्जनशीलता व दूरदृष्टीचा उत्तम गुण असतो. यासह फॅशन, संगीत, कला, डिझाइन, मनोरंजन आणि विलासी जीवनशैली यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांना विशेष रस असतो. या व्यक्तींचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या आसपासच्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे त्यांना आदर आणि प्रशंसा आवडते.
अंकशास्त्रानुसार मुलांक ६ असलेल्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत रोमँटिक आणि भावूक मानल्या जातात. आपल्या जोडीदाराच्या अगदी छोट्या-छोट्या गरजांचीही काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी नात्यामध्ये प्रेमाप्रमाणेच विश्वास आणि आदरही तितकाच महत्त्वाचा असतो. ते आपले नाते दृढ ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात.
टीप: अंकशास्त्र हे समजुतींवर आधारित आहे. याकडे निश्चित भाकीत नाही. या गोष्टीला साम टीव्ही सहमत किंवा दुजोरा देत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.