Numerology reveals that Mulank 2 people are emotionally balanced and naturally attract wealth and prosperity. saam tv
राशिभविष्य

Numerology Personality Traits: 'या' मुलांकाच्या लोकांकडे असतो धनाचा मोठा साठा, कधीच नसते पैशांची चणचण

Numerology Personality Traits: अंकशास्त्रानुसार २, ११, २०, २९ या तारखांना जन्मलेल्या लोकांच्या जीवनात शांती, समजूतदारपणा आणि आर्थिक सुरक्षितता अधिक असते. त्यांच्यात नियोजन आणि इतरांना मदत करण्याचा गुण असतो.

Bharat Jadhav

  • २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक २ असतो.

  • चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक स्थैर्य आणि शांत स्वभाव असतो

  • आर्थिक नियोजन उत्तम असल्याने पैशांची चणचण नसते.

अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला होतो, त्यांचा मूळ अंक २ असतो. चंद्राचा या मुलांकावर प्रभाव असतो. चंद्राला शांती, संवेदनशीलता आणि मानसिक स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. हे लोक भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात संतुलन कसे राखायचे हे माहित असते. या चार तारखेला जन्मलेल्या २ मुलांकाच्या लोकांची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया

संपत्ती जमवण्यात एक्सपर्ट

दोन मुलांक असलेले लोक संपत्ती जमवण्यात पटाईत असतात. त्यांना आयुष्यात अचानक येणाऱ्या उत्पन्नाची किंवा खर्चाची चिंता नसते. कारण कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे नेहमीच आर्थिक संसाधने असतात. हे लोक त्यांच्या कामात नियोजन आणि शिस्त पाळतात.

यशस्वी होतात.

२ मुलांक असलेल्या लोकांना अनेकदा स्वतंत्रपणे काम करण्यात जास्त यश मिळते. शाश्वत उत्पन्नासाठी नोकरी हा एक चांगला पर्याय असतो, पण ते स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतंत्र दुसरे काम करण्यास उत्सुक असतात. यात त्यांना यश देखील मिळते. पण ते जीवन पूर्णतः जगण्यावर विश्वास ठेवतात.

लोकांना आकर्षित करण्यात पटाईत

मूलांकाच्या दुसऱ्या आणि चौथ्या तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या मोकळ्या आणि मुक्त स्वभावासाठी ओळखले जातात. ते लोकांना लवकर आकर्षित करण्यात पटाईत असतात. मैत्री आणि सहकार्यात ते नेहमीच आघाडीवर असतात. त्यांना निष्काळजीपणा आणि बेशिस्त वर्तन आवडत नाही. जीवनात नियम आणि शिस्त त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. हे लोक नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असतात. कधीकधी ते इतरांच्या गोड बोलण्याने फसतात.

प्रेम जीवन कसे असते

२ अंक असलेले लोकांचे कौटुंबिक जीवन आनंद देणारं असतं. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये त्यांचे योगदान नेहमीच स्थिर आणि विश्वासार्ह असते. त्यांचे प्रेम जीवन स्थिर नसते. त्यांच्यासाठी दीर्घकालीन नातेसंबंध टिकवणे आव्हानात्मक असते. या व्यक्ती विविध क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्यांना शेती, पाणी, न्याय, शिक्षण, बँकिंग, आरोग्य आणि सामाजिक कार्यात आनंदासह यश मिळत असते.

हे लोक भावनांनी सहजपणे प्रभावित होतात. त्यांचे प्रेमसंबंध अस्थिर असतात. कधीकधी ते इतरांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता जास्त असते. हा निगेटिव्ह गुण असला तरी त्यांचे मजबूत मानसिक संतुलन आणि नियोजनबद्ध दृष्टिकोन त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

SCROLL FOR NEXT