Rashi Bhavishya Today 18th June 2024 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today : निर्जला एकादशीला जुळून आला खास योग; या राशींच्या लोकांना कामात मिळणार मोठे यश

Rashi Bhavishya 18 June 2024 : आज निर्जला एकादशी तुमच्या राशीसाठी आज काय विशेष? जाणून घ्या राशी भविष्याच्या माध्यमातून...

Anjali Potdar

आजचे पंचांग १८ जून २०२४

वार - मंगळवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल एकादशी. नक्षत्र स्वाती. योग - शिव. करण - विष्टी/ बालव. रास - तूळ. निर्जला एकादशी . या उपोषणाने बारा एकादशी व्रताचे फल मिळते. दिनविशेष - १६ पर्यंत चांगला.

मेष : कोर्ट कचेरीत यश मिळेल

आपली सेनापतीची अर्थात मंगळाची रास आहे. डोके गरम असते. पण आजचा दिवस वेगळा राहणार आहे. "अधीर मन झाले" अशी आज जोडीदाराविषयी भावना येईल. प्रेमाच्या गोष्टी मनामध्ये रुंजी घालतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल.

वृषभ : विनाकारण त्रास होतील

अडचणींचा सामना आज करावा लागेल. आपल्या राशीप्रमाणे मनामध्ये चैनीच्या गोष्टी किंवा मजेत च्या गोष्टी आज जर मनात येत असतील तर त्या घडणार नाहीत. विनाकारण त्रास होतील.

मिथुन : आज सतर्कता बाळगा

आज निर्जला एकादशी. विष्णू उपासनेने विशेष पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे. त्यामुळे हे औचित्य साधाच. कुठल्याही गोष्टींमध्ये व्दिधा राहू नका. धार्मिक व अध्यात्म कार्यात सहभाग घ्या.

कर्क : कामांमध्ये मोठे यश मिळेल

कामाच्या कक्षा आज वाढतील. आज फिरती आणि भ्रमंती याचा आज दिवस आहे. एकूणच केलेल्या कामांमध्ये यश सिद्धी ते प्रसिद्धी असा दिवस आहे.

सिंह : अनेक लाभ पदरात पडतील

आपली रासच मुळात उदारमतवादी आहे. एखादी गोष्ट मनात ठरवली तर त्या गोष्टी करताच. आज मात्र आपल्या स्वभावाप्रमाणे इतरांना बरोबर घेऊन काम कराल. उदारता राहणारच आहे. त्याबरोबर अनेक लाभही पदरात पडतील. नात्यांचा संवाद जपाल.

कन्या : मन उद्विंग्न होईल

"आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा" असा आजचा दिवस आहे. खरंतर मन उद्विंग्न होईल. म्हणूनच यातून बाहेर पडण्यासाठी सातत्याने सकारात्मक विचार आणि कामासाठी सतत्याची आज गरज आहे.

तूळ : आजचा दिवस सोन्यासारखा असेल

"स्वर्ग हा नवा भासतो जसा" असा आजचा दिवस आहे. खरंच शुक्राचे सर्व गुणधर्म घेऊन आजचा दिवस आपल्याला अमृत कण वेचायला लावणार आहे. त्यामुळे सकारात्मकता राहील मन प्रसन्न राहील.

वृश्चिक : उपासनेवर विशेष भर द्या

आज निर्जला एकादशी आहे उपासनेवर विशेष भर द्या. लक्ष्मी विष्णूची उपासना अर्थप्राप्तीसाठी आज धनदाई ठरेल. म्हणून त्याचा विशेष लाभ घ्या. कुटुंबीयांसोबत सात्विकतेने दिवस जाईल .

धनु : अनेक गोष्टी मनासारख्या होतील

पराक्रमात आज भर पडेल. अनेक गोष्टी मनासारख्या होतील. अपेक्षांना पंख फुटतील. भावंडांचे विशेष सौख्य लाभेल. दिवस चांगला जाईल .

मकर : मेहनत घेण्याचा दिवस

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" मनामध्ये काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी विशेष मेहनत घेण्याचा आजचा दिवस आहे. घरामध्ये धार्मिक वातावरण ठेवल्यास आनंद वृद्धिंगत होईल.

कुंभ : एकादशीचे पुण्य मिळेल

आज विष्णू उपासनेसाठी दिवस पर्वणी घेऊन आलेला आहे. एकादशीचे पुण्य मिळेल. जास्तीत जास्त जप करा. संततीसाठी सुख वार्ता मिळतील. पैशाचे व्यवहार सुरळीत होतील .

मीन : आज थोडे सावधच राहा.

आपली द्विस्वभाव रास आहे. साधा स्वभाव आहे. याचाच फायदा अनेक जण घेतात. पण आज थोडे सावधच राहा. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. हाताखाली लोक विनाकारण त्रास देतील. नोकरीमध्ये मात्र अपेक्षित फळ मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT