Guru Gochar Saam Tv
राशिभविष्य

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Guru Margi 2026: देवगुरू बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह हे ज्योतिषशास्त्रानुसार धन, भाग्य, ज्ञान आणि विस्ताराचे कारक मानले जातात. पुढच्या वर्षी, जून २०२६ मध्ये गुरु ग्रह मार्गी होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार, गुरु ग्रहाला धार्मिक कार्य, धन, दान, पुण्य आणि वाढ यांचं कारक मानण्यात येतं. ज्योतिषशास्त्रामध्ये बृहस्पती ग्रह 27 नक्षत्रांपैकी पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रांचे स्वामी आहेत. तसंच गुरु ग्रह धनु आणि मीन राशीचे स्वामी आहेत.

यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये गुरु ग्रह 5 डिसेंबर रोजी मिथुन राशीत प्रवेश करून पुन्हा वक्री होणार आहेत. यानंतर 11 मार्च 2026 पर्यंत मिथुन राशीत मार्गी राहणार आहेत. अशा परिस्थितीत गुरु ग्रहाच्या मार्गी होण्यामुळे काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचे मार्गी होणं अत्यंत लाभदायी ठरू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होण्याची दाट शक्यता आहे. विवाहितांसाठी वैवाहिक जीवन आनंदी राहील तर अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

गुरु ग्रहाचं मार्गी होणं वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे. गुरु ग्रह तुमच्या राशीपासून अष्टम भावात मार्गी होणार आहेत. ते तुमच्या राशीपासून धन आणि पंचम भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होऊ शकणार आहे. मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

गुरु ग्रहाची सरळ चाल सिंह राशीच्या लोकांसाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. गुरु ग्रह तुमच्या राशीपासून 11व्या भावात मार्गी होणार आहेत. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रयत्न तुम्हाला चांगला लाभ देतील. प्रवास आणि नवीन संपर्क लाभदायी ठरतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Winter Skin Care : हिवाळ्यात मेकअप कसा टिकवावा? जाणून घ्या टिप्स

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले; १० तोळ्यामागे ८६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

ZP And Municipal Elections: निवडणुकीत आरक्षण मर्यादेचं उल्लंघन; झेडपी, महापालिका निवडणूक लांबणीवर?

SCROLL FOR NEXT