Neechbhang Rajyog Saam TV
राशिभविष्य

Neech Bhang Rajyog: 12 महिन्यांनी बनणार 'नीचभंग राजयोग'; शुक्रदेव 'या' राशींचं नशीब पालटणार

Neech Bhang Rajyog 2025: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ठराविक वेळेनंतर प्रवेश करतात. या गोचरमुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होतात. यातलाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि धन-वैभव देणारा योग म्हणजे 'नीचभंग राजयोग'

Surabhi Jayashree Jagdish

दैत्‍यांचे गुरु शुक्र ग्रह ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. संपत्ती, ऐश्‍वर्य, विवाह, प्रेम, आकर्षण, भोग-विलास यांचे ते प्रमुख कारक आहेत. शुक्र साधारणतः प्रत्येक राशीत २६ दिवस राहतो. त्यामुळे १२ राशींचा पूर्ण फेरफटका घेऊन पुन्हा त्याच राशीत परत यायला साधारण एक वर्षाचा कालावधी लागतो.

यंदा शुक्र ९ ऑक्टोबर रोजी बुधाची रास असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या ही शुक्राची नीच रास असल्यामुळे याठिकाणी शुक्राचा प्रभाव कमी होतो. परंतु, या वेळी सूर्यदेखील कन्या राशीत असल्यामुळे ‘नीचभंग राजयोग’ नावाचा विशेष योग निर्माण होत आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्र आपल्या नीच राशीत असताना एखाद्या शुभ ग्रहासोबत युती झाली तर नीचभंग राजयोग तयार होणार आहे.

कन्या रास (Virgo)

या राशीच्या लग्नभावात नीचभंग राजयोग तयार होत आहे. यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना जीवनाच्या विविध क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचा काळ आनंददायी ठरू शकणार आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह पगारवाढीची शक्यता आहे. तर नोकरीच्या शोधात असलेल्यांनाही योग्य संधी मिळू शकते.

सिंह रास (Leo)

या राशीच्या दुसऱ्या भावात नीचभंग राजयोग तयार होणार आहे. कौटुंबिक मतभेद मिटण्याची शक्यता आहे. अविवाहितांना योग्य विवाह प्रस्ताव मिळू शकणार आहे. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल आणि त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढणार आहे. आर्थिकदृष्ट्याही सकारात्मक काळ येऊ शकतो.

वृश्चिक रास (Scorpio)

या राशीच्या एकादश भावात नीचभंग राजयोग होणार आहे. ज्यामुळे समाजात प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याची शक्यता आहे. मित्रमंडळीसोबतचा वेळ आनंददायी जाणार आहे. नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत नवीन संधी प्राप्त होऊ शकणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ लाभदायी ठरण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांसाठी खूशखबर! टोल भरण्याची आता गरजच नाही, टोल प्लाझापासून किती दूर राहिल्यास मिळते सूट?

Accident : पुण्यात मोठी दुर्घटना! एमआयडीसीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Gold Price Today : मुंबई-पुण्यात सोन्याच्या किंमतीत झाली घसरण, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Gautam Gambhir: वनडे सिरीज जिंकल्यानंतर विराट-रोहितबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर? IPL टीमच्या मालकांनाही सुनावले खडे बोल

SCROLL FOR NEXT