Shani Budh Yuti 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Budh Yuti: दिवाळीनंतर बनणार नवपंचम राजयोग; वर्षाच्या अखेरीस 3 राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Shani Budh Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक प्रकारचे शुभ योग तयार होतात, ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. दिवाळीचा सण संपल्यानंतर काही महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीमुळे एक अत्यंत शक्तिशाली असा नवपंचम राजयोग (Navapancham Rajyoga) तयार होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांचा गोचर प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे बदल घडवून आणतो. प्रत्येक सण-उत्सवाच्या वेळी ग्रहांची विशिष्ट स्थिती निर्माण होते. ज्याचा बाराही राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. या वर्षी दिवाळीचा उत्सव २० ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे.

या दिवशी ज्योतिषदृष्ट्या एक अत्यंत सामर्थ्यशाली योग तयार होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, या वर्षीच्या दिवाळीत शनि आणि बुध यांचा विशेष संयोग होणार असून त्यातून नवपंचम राजयोगाची निर्मिती होणार आहे. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, हा योग काही राशींसाठी धन, यश आणि प्रगतीची नवीन दारं उघडून देणारा ठरणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या जातकांसाठी हा योग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. इच्छित यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. करिअरमध्ये उन्नती होईल तसंच व्यवसायात मोठ्या नफ्याची संधी मिळणार आहे. या काळात आत्मविश्वास वाढू शकतो. कुटुंबात शुभवार्ता मिळेल आणि समाजातील मान-सन्मान वाढणार आहे. शनि-बुध यांचा हा दुर्मीळ संयोग वर्षाच्या अखेरीस तुम्हाला भरपूर लाभ देणारा ठरणार आहे.

कर्क रास

या विशेष राजयोगाचा थेट परिणाम कर्क राशीच्या जातकांवर दिसून येणार आहे. बराच काळ अडकून राहिलेलं काम यशस्वीपणे पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती बळकट होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. जीवनात सुखसोयी टिकून राहतील.

मकर रास

शनि आणि बुध यांचा हा अद्वितीय संयोग मकर राशीच्या व्यक्तींसाठी नवी संधी आणि प्रगतीची दारं उघड. कार्यक्षेत्रात एखाद्या मोठ्या जबाबदारीची संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात भाग्य तुमच्या पाठीशी राहील. दांपत्यजीवनातील मतभेद व गैरसमज दूर होतील, नातेसंबंधात गोडवा वाढेल. व्यापाऱ्यांना अचानक मोठ्या नफ्याचा लाभ होईल. दीर्घकाळापासून व्यवसायात येत असलेले नुकसानही थांबेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOB Recruitment: आनंदाची बातमी! बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: इतिहासात प्रथमच सोलापूरमधील सीना नदीला महापूर, 26 गावात शिरले पाणी

Upvasachi Khichdi: नवरात्री स्पेशल! नऊ दिवसात उपवासाला एकदा तरी बनवा उपवासाची खिचडी, सोपी आहे रेसिपी

Beed Rain : बीडमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस, सिंदफणा नदीला रौद्ररुप | पाहा VIDEO

Sahibzada Farhan: युद्धखोरीचा माज! साहिबजादा फरहान हॅरिस रौफची अ‍ॅक्शन, भारतानं ठेचल्या त्यांच्या नांग्या

SCROLL FOR NEXT