Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog : 18 मे रोजी बनणार शक्तीशाली नवपंचम राजयोग; राहू-गुरु 'या' राशींवर राहणार मेहेरबान

Navpancham Rajyog 2025: ग्रहांच्या युतीमुळे राजयोगांची निर्मिती होते. यावेळी मे महिन्यात दोन ग्रहांची युती होणार आहे. ही ग्रहांची युती काही राशींना मालामाल करणारी असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

देवतांचा गुरु बृहस्पती एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. १४ मे रोजी गुरु वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे राहू देखील मीन राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. अशामध्ये गुरु आणि राहू मिळून नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, १४ मे रोजी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी तो मिथुन राशीत प्रवेश कऱणार आहे. ४ दिवसांनी म्हणजेच १८ मे रोजी ४ वाजून ३० मिनिटांनी राहू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे खाही राशींना लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन रास

नवपंचम राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशींच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. तुम्हाला नवी नोकरी मिळू शकते. करियरमध्ये तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे. उच्च शिक्षण घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जीवनात आनंद येणार आहे.

कुंभ रास

या राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग आहेत. तुमच्या मनात असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. तुम्हाला मोठा पगाराची नोकरी करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते.

कन्या रास

या राशींच्या व्यक्तींसाठी नवपंचम राजयोग लकी ठरू शकणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अपार धनलाभ मिळू शकतो. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होणार आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारून तुमच्या घरात पैसे येणार आहेत. गुंतवणूक करायची असल्यास तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT