Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांवर श्री गणरायांचा कृपादृष्टी पडण्याची शक्यता आहे. तर काहींना शुभसंकेत मिळणार आहे.

Anjali Potdar

पंचांग

सोमवार,२४ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुक्लपक्ष,विनायकी चतुर्थी.

तिथी-चतुर्थी २१|२३

नक्षत्र-पूर्वाषाढा

योग-शूल

करण-वणिज

दिनविशेष-८ प.चांगला

मेष - भगवंताची कृपा असेल तर सर्व गोष्टी सुकर होतात. अशी काहीशी अनुभूती येण्याचा आजचा दिवस आहे. उपासनेमध्ये मन रमेल. मनोरथ पूर्ण होतील. ठरवलेल्या गोष्टी नियोजनबद्ध झाल्यामुळे एक वेगळा दिलासा मिळेल.

वृषभ - आज विनायक चतुर्थी रिक्ता तिथी आहे. काही गोष्टी रिक्तपणे देऊन आपण रिक्त झालेले योग्य असते. अडचणींचा सामना करावा लागेल. पण एकटेपणाही सहन करावा लागेल. कोणाच्या सहकार्याची अपेक्षा आज कामासाठी नको.

मिथुन - नको असलेल्या कटकटी मागे लागतील. कदाचित कोर्टाची पायरी चढावी लागेल. पुढील गोष्टींची योग्य ती मांडणी केल्यामुळे या सर्व गोष्टीतून सुकर बाहेर याल. भागीदारी व्यवसायामध्ये आज फायदा आहे.

कर्क - मानसिक अस्वस्थता जाणवेल.कदाचित हळवेपण जास्त दाटेल .आपल्याच लोकांनी घात केल्यासारखी भावना आज होणार आहे. नोकरी मध्ये मात्र "केल्याने होत आहे रे" असा दिवस आहे.

सिंह - उपासना, प्रवास, संततीसौख्य, विद्यार्जन, शेअर्स, लॉटरी, कला, क्रीडा, प्रेम, प्रणय, धनलाभ या सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस चांगली संधी घेऊन आलेला आहे. याचे सोने करा.

कन्या - गृहसौख्य उत्तम राहील. घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. कामांमध्ये प्रगती होईल. समाजात पत मिळेल. दिवस चांगला आहे काळजी नसावी.

तूळ - भावंड सौख्य उत्तम लाभेल. आनंदासाठी काही गोष्टी घडतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढीस लागेल. नवीन जबाबदाऱ्या पेलाल. एक वेगळी ताकत आज तुमच्यात असेल.

वृश्चिक - पैशाची आवक-जावक चांगली राहील. तिखट मसालेदार पदार्थ खाण्यासाठी इच्छा होईल. जोडीदाराची तब्येत आज जपावी. कामाच्या ठिकाणी विनाकारण अडचणी उदभवतील.

धनु - मनाचे मनोरे फुलून येतील. स्वच्छंदी आनंद दिवस जगण्यासाठी विशेष खटाटोप कराल. स्वतःच्या प्रेमात धुंद रहाल. दिवस अनेक विविध संधी घेऊन आलेला आहे. आरोग्य चांगले राहून कामे मार्गी लागतील.

मकर - संततीला काहीतरी अडचणी उद्भवतील. सहज सोप्या गोष्टी अवघड होऊन बसतील. आज शक्तीने नाही तर युक्तीने काम करावे लागेल. मनस्वास्थ्य जपा.

कुंभ - मोठी काही स्वप्न तुम्ही पाहिली असतील तर आज ती पूर्ण होण्याचा दिवस आहे. नव्याने परिचय होतील. लोकांच्या ओळखी होतील. एकत्रितरित्या सांघिक काम करण्याचा आज योग आहे.

मीन - समाजकारण, राजकारणामध्ये प्रगती येतील. वेगवेगळे सन्मान लागतील. कामाच्या ठिकाणी यश असा काहीसा दिवस आहे. वरिष्ठांना मान द्या आणि तुमचा सन्मान घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

Maharashtra Live News Update: काँग्रेस -मनसे आघाडीबाबत विजय वडेट्टीवार यांचं पुन्हा भाष्य

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT