Monday Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : आयुष्याला नवीन दिशा, नवे मार्ग सापडणार; 5 राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Monday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना नवा मार्ग सापडणार आहे. तर काहींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.

Anjali Potdar

पंचांग

सोमवार,१३ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष,कराष्टमी,कालाष्टमी.

तिथी-सप्तमी १२|२५

नक्षत्र-आर्द्रा

रास-मिथुन २९|५९ नं. कर्क

योग-परिघ ०८|१०

शिव २९|५५

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - एखादी महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडेल. अर्थात ती पेलण्याची ताकद आज तुमच्यात आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या लोकांच्या मदतीने पुढे जाल.

वृषभ - जुनी येणी वसूल होणार आहेत. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे सहज काही गोष्टी घडतील. धन योगाला दिवस चांगला आहे. जे ठरवाल ते होईल काळजी नसावी.

मिथुन - आज आपल्याला जोडीदाराची अपेक्षित साथ लाभणार आहे. कामाच्या बाबतीत भागीदाराचे सुद्धा सहकार्याला त्यामुळे व्यवसाय आणि व्यापारात सुयश मिळण्याचे योग आहेत.

कर्क - आयुष्यात अडचणी आल्याशिवाय अध्यात्माची ओढ कळत नाही. आज काही त्रास उद्भवेल ज्यामुळे आपला अध्यात्माकडे कल राहील. आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत ना याची काळजी घ्या.

सिंह - महत्त्वाच्या पत्र व्यवहाराला आजचा दिवस चांगला आहे.नव्याने हितसंबंध प्रस्थापित होतील असे दिसते आहे. जवळच्या प्रवासामधून फायदा होईल. दिवस चांगला आहे.

कन्या - तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली घोडदौड आज होणार आहे. सरकारी कामे शासकीय गोष्टी काही रखडले असतील तर आज मार्गी लागतील. एकूणच मान सन्मान आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे.

तुळ - महत्त्वाच्या गोष्टी कानावर येतील.यशाची दारे आपोआप उघडतील. भाग्यकारक घटना घडण्याचा आजचा दिवस आहे.देवी उपासना विशेष फलदायी ठरणार आहे.

वृश्चिक- दैनंदिन कामे यामध्ये अडचणी येण्याचा संभव आहे. स्वभावाप्रमाणे तापटपणा आज वाढेल. पण शक्यतो वादविवाद करणे टाळलेले. बरे नाहीतर "आ बैल मुझे मार" अशी अवस्था होईल.

धनु - आयुष्याला नवीन दिशा, नवे मार्ग सापडणार आहेत. एकूणच उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना आज घडतील. दिवस चांगला आहे.

मकर - कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य आज लाभणार आहे. मात्र काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील .आपल्या तब्येतीकडे बेदखल करू नये. असा आज सल्ला आहे.

कुंभ - संतती सौख्याला दिवस उत्तम आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. शेअर्स आणि लॉटरीमध्ये आज नशीब आजमावायला हरकत नाही. दिवस चांगला आहे.

मीन - प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नव्या नव्याने प्रस्ताव आज समोर येतील. आलेल्या गोष्टींची दोन हात करण्याची ताकद आपल्यात येईल. आत्मविश्वास वाढेल आणि व्यवहार पूर्ण होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Risk: कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कोणत्या रुग्णांना जास्त असतो? डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

Maharashtra News Live Update: कात्रज घाटामध्ये ट्रॅफिक जॅम

Actress Harassment: सुट्टीत आजोळी गेल्यावर चुलत भावाने केलं शारीरिक शोषण; अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Shocking : आधी इस्त्रीने छातीवर वार केले, नंतर गळा दाबून हत्या; शिक्षिकेसोबत पतीने भयंकर केलं

मोठी बातमी! भाजप खासदाराला अटक होणार, २ अजामीनपात्र गुन्हे दाखल; महिलांवर अत्याचार अन् भ्रष्ट्राचाराचा आरोप

SCROLL FOR NEXT