Budh Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Budh Gochar 2025: 7 दिवसांना बुध करणार नक्षत्र गोचर; बिझनेस आणि नोकरीत मिळणार चांगली संधी

Mercury nakshatra transit: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळेनंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतो. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह लवकरच आपले नक्षत्र बदलणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो. साधारण पंधरा दिवसांनी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्याचबरोबर काही कालावधीनंतर तो नक्षत्रही बदलतो. याचा थेट परिणाम काही राशींवर होत असतो. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 30 ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शिवाय त्याच दिवशी मघा नक्षत्रातही गोचर करणार आहे. बुध ज्यावेळी केतूच्या अधिपत्याखालील मघा नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा बुद्धी, विचारशक्ती आणि अध्यात्मिक क्षेत्रावर जास्त प्रभाव पडतो.

मघा नक्षत्राची माहिती

ज्योतिषशास्त्रात मघा हे आकाशातील 27 नक्षत्रांपैकी 10वे नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्राचा स्वामी केतू असून तो पितृसंबंध आणि वंशपरंपरेशी जोडलेला मानला जातो. बुध 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजून 48 मिनिटांनी मघा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 6 सप्टेंबरपर्यंत तिथेच राहील. त्यानंतर तो पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात जाणार आहे.

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाचा हा गोचर लाभदायक ठरू शकतो. या काळात नशीब तुमच्या पाठीशी असणार आहे. मनात दडवून ठेवलेल्या गोष्टी तुम्ही धाडसाने व्यक्त करू शकाल. यामुळे मन हलके वाटेल.

सिंह राशी (Leo)

सिंह राशीच्या लोकांना बुधाचा मघा नक्षत्रातील प्रवास अनेक क्षेत्रांत फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या बुद्धीमत्तेत झपाट्याने वाढ होणार आहे. करिअर किंवा व्यवसायात संवादकौशल्याच्या जोरावर प्रगती साधता येणार आहे. समाजात मान-सन्मान मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

वृश्चिक राशी (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. बुधाच्या या गोचरामुळे नशिबाची साथ मिळेल. बुद्धी आणि तर्कशक्ती वाढेल, ज्यामुळे अनेक क्षेत्रांत यश मिळू शकतं. जुने प्रश्न किंवा अडथळे यावर आता तोडगा निघू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. करिअरमध्ये लाभाचे संकेत आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aabeer Gulaal: पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात होणार प्रदर्शित? वाचा महत्वाची अपडेट

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर ऐकून थक्क व्हाल

महामार्गावर भयंकर घडलं, कंटेनरचा ब्रेक फेल, ९ चारचाकींना उडवलं; घटना CCTVत कैद

Viral Social Media Post : ड्रग्ज पार्टीनंतर न्यूड पार्टीचे आमंत्रण, इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे वाद, नेमकं प्रकरण काय आहे?

Heavy Rain : पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; २० गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT