Budh Gochar Saam tv
राशिभविष्य

Budh Gochar 2024: 10 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह करणार गोचर; अडचणी दूर होऊन 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा

Budh Gochar 2024: ग्रहांचा राजकुमार १० ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे, जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. याचा प्रभाव जवळपास सर्व म्हणजे १२ राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. यामध्ये काही राशींच्या व्यक्तींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळू शकतात. येत्या काळात बुध ग्रह गोचर करणार असून याचा कसा परिणाम होणार आहे, ते पाहूयात.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार १० ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १० ऑक्टोबर रोजी ११ वाजून २५ मिनिटांनी बुध तूळ राशीत गोचर करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे, जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

तूळ राशीतील बुधाचं गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ मानलं जातंय. या काळात तुमच्या प्रगतीचे नवीन दरवाजे उघडतील. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य मिळणार आहे.

कर्क रास

बुध ग्रहाचं गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. यावेळी नोकरदारांचे पगार वाढू शकतात. व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात, ज्यामध्ये नफा चांगला मिळणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाच्या गोचरमुळे चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर समस्या दूर होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहणार आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुम्हाला चांगली बातमी देखील मिळू शकते. कुटुंबामधील वाद दूर होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

SCROLL FOR NEXT