Budh Grah Uday saam tv
राशिभविष्य

Budh Uday: एप्रिलमध्ये ग्रहांचा राजा बुधाचा होणार उदय; 'या' 3 राशींचा वाढणार पगार, अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता

Budh Grah Uday: पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या स्थितीबदलाने काही राशींच्या आयुष्यात चांगले बदल होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी एखादा ग्रह उदित होतो किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. एप्रिलमध्ये मीन राशीत बुध राशीचा उदय होणार आहे. ज्यावेळी एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळ येतो तेव्हा तो अस्त होतो आणि त्याची शक्ती कमी होते. जेव्हा ते सूर्यापासून दूर जातो तेव्हा त्याच्या उदय होतो.

येत्या काळात बुधाच्या उदयाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहे ज्यांच्यावर याचा चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे .बुध ग्रहाता उदय उत्पन्न आणि नफ्याचं ठिकाण मानलं जातं. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकतं. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात.

मिथुन रास

तुमच्या राशीपासून कर्म घरात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुम्हाला व्यवसायात अनपेक्षित यश मिळू शकण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

कुंभ रास

तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसऱ्या घरात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. ज्याला धन आणि वाणीचे घर म्हटलं जातं. यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्ही ते या काळात मिळवू शकता. या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. नवी महागडी वस्तू खरेदी करू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी महापालिका अधिकारी-कर्मचारी संतप्त; महामार्गावर रास्ता रोको

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT