Budh Asta saam tv
राशिभविष्य

Budh Asta 2024: बुध ग्रह वक्री अवस्थेत होणार अस्त; 'या' राशींच्या नात्यात येणार दुरावा, राहा सतर्क

Budh Asta 2024: ज्योतिष शास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बुध ग्रहाच्या स्थितीत बदल होऊ शकणार आहेत. २६ नोव्हेंबर रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये वक्री होणार आहे.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या नवग्रहांमध्ये बुध ग्रहाला फार शुभ मानलं जातं. एका निश्चित वेळेनंतर बुध त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. ज्योतिष शास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बुध ग्रहाच्या स्थितीत बदल होऊ शकणार आहेत.

२६ नोव्हेंबर रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये वक्री होणार आहे. तर 30 रोजी त्याच स्थितीत अस्त होणार आहे. बुध हा सुख, संपत्ती, समृद्धी, बुद्धिमत्ता, तर्क, एकाग्रता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. बुध ग्रहाच्या अस्तामुळे अनेक राशींचं नशीब उजळू शकणार आहे. बुध ग्रहाच्या या अस्तामुळे काही राशींच्या अडचणीत वाढ होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कर्क रास

या राशीमध्ये बुध पाचव्या भावात अस्त करणार आहे. या राशीच्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. सुरु असलेल्या रिलेशनशिपमध्ये काही समस्या येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत काही ना काही कारणावरून मतभेदही होऊ शकतात.

मेष रास

या राशीत बुध वक्री होणार आहे. या काळात आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. लहान भाऊ किंवा बहिणीशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. आर्थिक स्थितीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

या राशीमध्ये बुध सातव्या भावात अस्त करणार आहे. अशा परिस्थितीत नशीब या राशीच्या लोकांना साथ देणार नाही. कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहा. अनावश्यक वादाचा तुमच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : कसब्याची जनता मला पुन्हा निवडून देईल- रवींद्र धंगेकर

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT