Mercury  saam tv
राशिभविष्य

Mercury Transit : बुधाच्या गोचरमुळे 'या' राशींना लागणार ग्रहण; आयुष्यात होणार नकोसे बदल, संकंटांचा डोंगरही कोसळणार

Mercury transit effects: बुध गोचरमुळे तीन राशी अशा आहेत ज्यांना काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी सतर्क राहण्याची गरज आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतो. बुध ग्रह 19 ते 20 दिवसात त्याच्या राशीमध्ये बदल करतो. बुध ग्रह ज्यावेळी गोचर तेव्हा त्याचा पहिला प्रभाव व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर, व्यवसायावर, तर्कशक्तीवर, शिक्षण आणि संवादावर होतो.

नुकतंच बुध ग्रहाने सुमारे 20 दिवसांनी आपली राशी बदलली आहे. बुध ग्रहाच्या राशी बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे. या वेळी बुध गोचरमुळे तीन राशी अशा आहेत ज्यांना काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी सतर्क राहण्याची गरज आहे.

कधी झालं बुधाचं गोचर?

वैदिक कॅलेंडरच्या गणनेनुसार, 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5.45 वाजता बुध मकर राशीत प्रवेश केला आहे. तर 11 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12:58 पर्यंत बुध मकर राशीत असणार आहे.

मेष रास

बुधाच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव पडणार आहे. नात्यातील लोकांच्या भावना अस्थिर राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर संवेदनशील राहिल्याने अविवाहित लोकांचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चाच्या वाढत्या ओझ्यामुळे व्यापारी व दुकानदारांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे.

वृषभ रास

बुधाचं गोचर वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणार आहे. यावेळी कर्ज देणं किंवा घेणं योग्य होणार नाही. ज्या लोकांचे ह्रदय नुकतंच तुटलं आहे ते भूतकाळातील गोष्टींमुळे अवलंबून असू शकतं. यामुळे तुम्ही ऑफिसच्या कामात लक्ष केंद्रित करू शकणार नाही. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं टाळा.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी यावेळी बुधाचं गोचर चांगलं राहणार नाही. पोटाशी संबंधित समस्यांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मानसिक तणाव जाणवण्याची शक्यता आहे. वृद्ध लोकांचे शारीरिक स्वास्थ्य फारसं चांगलं राहणार नाही. ज्या लोकांचे नुकतंच लग्न झालंय त्यांच्या जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT